आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणुका शहाणे लवकरच परतणार छोट्या पडद्यावर, या लोकप्रिय मालिकेत झळकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'साराभाई वर्सेस साराभाई'नंतर जेडी मजेठिया आता खिचडीचा तिसरा सीजन घेऊन आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेतही सर्व जुन्या कलाकारांनाच घेण्यात येणार आहे. यात अनंग देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि यांचा समावेश आहे. जेडी मजेठिया या शोची निर्मितीही करणार आहेत. याशिवाय काही नवे चेहऱ्यांचाही या शोमध्ये समावेश आहे. त्यातच एक नवा चेहरा आहे रेणुका शहाणे.
 
सध्या एका कॅमिओसाठीच रेणुका शहाणे यांना मालिकेत घेण्यात आले आहे. रोल लहान असला तरी इंटरेस्टींग असणार असे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या सीझनचे शूटही सुरु झाले आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, प्रोड्युसर आतिश कपाडीया आणि जेडी मजेठिया यांची मुलेही याच मालिकेतून त्यांचा डेब्यू करणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...