आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरा रंग, घाऱ्या डोळ्यांमुळे तेजस्विनी 'सिंधूताई'साठी झाली होती रिजेक्ट, नंतर असा मिळाला रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  आज सिंधुताई सपकाळ यांचा वाढदिवस. अनाथांची 'माई' म्हणून सिंधूताईंचे महान कार्य आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सिंधूताई यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावात त्यांचा जन्म झाला. सिंधूताई सपकाळ यांच्या महान कार्यावर अनंत महादेवन यांनी एक मराठी चित्रपट बनविला आहे. त्या चित्रपटात तेजस्विनी पंडीतने सिंधूताई सपकाळ यांची भूमिका केली होती. आज सिंधूताई यांच्या वाढदिवसानिमित्त मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटाबद्दलच्या तेजस्विनीच्या काही आठवणी शेअर करत आहोत. विदाऊट मेकअप गेली होती ऑडिशनला...
 
संजय पवार यांनी सिंधुताई सपकाळ चित्रपटासाठी तेजस्विनी पंडीतचे नाव सुचवले होते. संजय यांनी वावटळ नावाची फिल्म पाहिली होती त्यामुळे सिंधुताईच्या भूमिकेसाठी तेजस्विनी योग्य आहे असे त्यांना वाटत होते. तेव्हा संजय यांनी तेजस्विनीला विदाऊट मेकअप बी. आर. चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये भेटावयास जाण्यास सांगितले. 
 
अनंत महादेवन यांनी तेजस्विनीला ते सिंधुताई सपकाळ यांच्यावर चित्रपट करत असल्याचे सांगितले. त्यावेळी तेजस्विनीला सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी त्या केवळ समाजसेविका आहेत एवढेच माहीत होते. पण तेजस्विनीचा गोरा रंग आणि घारे डोळे पाहून अनंत महादेवन यांनी तेजस्विनीला तिथेच रिजेक्ट केले. तेजस्विनीचा हिरमोड झाला पण तिने त्यांना तिचे काम पाहावे, अशी इच्छा व्यक्त केली. 
 
त्यानंतर अनंत महादेवन यांनी तेजस्विनीचा 'वावटळ' हा चित्रपट पाहिला आणि त्यातच त्यांना तेजस्विनीत सिंधुताई सपकाळ दिसली. त्यानंतर अनंत महादेवन यांनी या चित्रपटात तेजस्विनीची वर्णी लावली. पण जेव्हा अनंत महादेवन यांनी सुखान्त हा चित्रपट पाहिला तेव्हा तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर यांची भूमिका त्यांना फार आवडली. तेव्हा संजय पवार यांनी हसतच ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडीत आई-मुलगी असल्याचे सांगितले. अशाप्रकारे सिंधूताई सपकाळमध्ये तेजस्विनी आणि तिची आई आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी काम केले. ज्योती चांदेकर यांनी वृद्ध सिंधुताई सपकाळ यांची भूमिका केली होती. मायलेकींनी अशाप्रकारे एकाच चित्रपटात एकच व्यक्तीरेखा साकारण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सिंधुताईच्या भूमिकेतील तेजस्विनीचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...