आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ती सध्या काय करतेय' फिल्ममधील ही अॅक्ट्रेस रिअल लाईफमध्ये अडकली लग्नाच्या बेडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या गाजलेल्या सिनेमात मोहिनी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. या सिनेमात अभिनेता अभिनय बेर्डेच्या प्रेयसीची भूमिका अभिनेत्री ईशा फडके हिने साकारली होती. दोघांवर चित्रीत झालेले 'जरा जरा…' हे गाणं अतिशय हिट ठरले होते. 

ईशा फडकेचा हा विवाह सोहळा 28 फेब्रुवारी रोजी  पुण्यात पार पडला. ईशा ही एक प्रोफेशनल डान्सर आहे. तिचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झालंय. पुण्यात वाकड परिसरातील इंदिरा कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झालं आहे. गेल्या 12 वर्षांपासून ती संभवी वझे–दांडेकर यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घेत आहे. तिने नुकतीच विशारद ही पदवी मिळवली आहे. गंधर्व महाविद्यालयातून तीने पदवी घेतली आहे. कथ्थक सोबतच ईशाने सालसाचे देखील प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण तिने रॉकी पूनावाला यांच्याकडून घेतले आहे. त्याचप्रमाणे ईशाचा आपल्या लोकनृत्यात देखील हातखंडा आहे. तिने गरबा, दांडिया, लावणी, भांगडा यामध्ये देखील तरबेज आहे.

पुढे बघा, ईशाच्या लग्नाचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...