आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. निलेश साबळे नव्हे आता \'दगडू\' करणार \'चला हवा...\'चे सूत्रसंचालन, जाणून घ्या कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर सोमवारी आणि मंगळवारी छोट्या पडद्यावर साडे नऊ वाजता ''प्रेक्षक हो हसताय ना... हसायलाच पाहिजे...'' असे म्हणत घराघरांत अवतरणारा होस्ट म्हणजे डॉ. निलेश साबळे. सासवड (पुणे) चा राहणारा एक मुलगा अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी घालतो. झी मराठी वाहिनीवरील अभिनयाच्या स्पर्धेत भाग घेतो आणि ती स्पर्धा तो जिंकतोसुद्धा. पुढे फू-बाई-फू मालिकेचा निवेदक म्हणून सर्वांच्या मनात घर करतो. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत त्याची गाडी सुसाट सुटते. पण आता काही काळासाठी निलेश ब्रेक घेतोय.
 
शोपासून काही काळासाठी ब्रेक घेतोय डॉ. निलेश साबळे 
आपल्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा डॉ. निलेश साबळे सध्या काही दिवस ‘चला हवा येऊ द्या’पासून दूर राहणार आहे. त्याची प्रकृती बिघडली असल्या कारणाने महिनाभर तरी निलेशला चित्रीकरणात सहभाग घेता येणार नसल्याने काही भागांपुरते शोचे सूत्रसंचालन टाईमपास 2 फेम दगडू अर्थातच अभिनेता प्रियदर्शन जाधवकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. 
 
प्रियदर्शन सांभाळणार धुरा... 
200 हून अधिक भागांचा टप्पा ओलांडलेल्या या शोचे डॉ. निलेश साबळे आणि त्याची टीम अत्यंत रंजक पद्धतीने सादरीकरण करत आहेत. या शोचा कॅप्टन असलेला निलेश पहिल्यांदाच काही भागंपुरता या शोपासून दूर जातोय. गेले काही दिवस त्याची प्रकृती बिघडलेली होती. त्याचे उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी काही आठवडे त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितली आहे. प्रियदर्शन जाधव स्वत: विनोदी अभिनेता, लेखक असल्याने त्याच्यावर काही भागांपुरते या शोचे सूत्रसंचलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  ‘चला हवा येऊ द्या’ हा शो पूर्णपणे नीलेशचा आहे. सध्या त्याची प्रकृती बरी नसल्याने मला काही भाग करण्यासाठी विचारणा झाली. काही भागांसाठी मी काम करणार असल्याने अजिबात दडपण घेणार नाही. पण मुळात मी सूत्रसंचलन फारसे केलेले नसल्याने प्रत्येक भाग चांगला होईल ही जबाबदारी असल्याचे प्रियदर्शनने सांगितले. निलेशची प्रकृती लवकरात लवकर ठिक व्हावी आणि त्याने पुन्हा या शोची धुरा स्वतःच्या खांद्यावर घ्यावी, याच सदिच्छा त्याचे चाहते व्यक्त करतील. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'चला हवा येऊ द्या' या शोमधील डॉ. निलेश साबळेची निवडक छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...