आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Timepass 2 Is Copy Of Hollywood And Bollywood Films

'टाइमपास 2' म्हणजे कॉपीकॅट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: हिंदी चित्रपटवाले हॉलिवूडची कॉपी करतात तर मराठी चित्रपटवाले हिंदी व हॉलिवूडची काहीशी. टाइमपास 2देखील त्याला काही अपवाद नाही. मुंबईत झालेल्या म्युझिक लाँचमध्ये या कॉपीचा नजारा पहायला मिळाला. गाण्यात नि पोस्टर्समध्येही कॉपी दिसून आली. टाइमपास 2 चा नायक प्रियदर्शन जाधव एका गाण्यात शाहरुख खानसारखे हवेत हात फैलावताना दिसतो तर कधी सलमान खानसारखी गल्लीतून एंट्री घेतो. एका पोस्टरवर टायटॅनिकच्या पार्श्वभूमीवर प्रियदर्शन व प्रियाची जोडी दाखवलीय तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ओेम शांती ओम चित्रपटाची कॉपी केली आहे. प्रत्यक्ष चित्रपटात या दोन्ही चित्रपटांचा फिल्मी संदर्भ असला तरी टाइमपास 2 हा मराठीतील टायटॅनिक करण्याचा रवी जाधवचा फुल टू प्रयत्न आहे. टायटॅनिक चित्रपटातही नायक गरीब तर नायिका उच्च वर्गातील असते. टाइमपास व टाइमपास 2 ची कथाही अशीच आहे. नि आता ट्रीटमेंटही टायटॅनिकसारखीच असल्याचे दिसते आहे. बघूयात टाइमपास 2 टायटॅनिकसारखा हिट ठरतो का ते...