आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'TP 2'च्या झक्कास आयटम नंबरवर सोनालीचे लटके-झटके, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाली कुलकर्णीचा 'मदन पिचकारी' गाण्यातील लूक)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'टाइमपास 2' हा सिनेमा येत्या 1 मे रोजी रिलीज होतोय. या सिनेमात अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री प्रिया बापट दगडू आणि प्राजक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शिवाय टाइमपासमध्ये झळकलेली प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर या जोडीचेही दर्शन सिक्वेलमध्येही घडणार आहे.
या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दिग्दर्शक रवी जाधव यांनी आयटम साँगचा तडका दिला आहे. 'मदन पिचकारी' हे शब्द असलेले हे आयटम साँग आहे. या गाण्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी थिरकताना दिसणार आहे. अपेक्षा दांडेकर आणि इश्क बेक्टर यांनी गायलेले 'मदन पिचकारी' हे गाणे सोनालीवर कोरिओग्राफ केले आहे उमेश जाधव यांनी. विशेष म्हणजे या गाण्यात सोनालीसोबत प्रिया बापटसुद्धा दिसतेय.
चला तर मग पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा सोनालीच्या मदन पिचकारीचा खास व्हिडिओ...