आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडू-प्राजुची LOVE STORY \'मल्टिप्लेक्स\'मध्येही झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टाइमपास 2' हा बहुचर्चित सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे दगडू आणि प्राजुची निखळ प्रेमकथा प्रेक्षकांना आता मल्टिप्लेक्स मध्येही पाहाता येणार आहे.

'टाइमपास 2' आणि अक्षय कुमारचा 'गब्बर' हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी अर्थातच शुक्रवारी (1 मे 2015) रिलीज झाले आहेत, म्हणून 'टाइमपास 2'ला मल्टिप्लेक्स स्क्रिन मिळत नव्हती. त्यामुळे हा सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यावर वाद निर्माण झाला होता.
'टाइमपास 2' या मराठी सिनेमाला नफ्यात 48 ते 50 टक्के वाटा न मिळाल्यास सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्माते 'एक्सेल व्हिजन'ने घेतला होता. मात्र गुरुवारी (30 एप्रिल) झालेल्या बैठकीत मल्टिप्लेक्स मालकांनी या सिनेमासाठी 48 ते 50 टक्के वाटा द्यायची तयारी दाखवल्यानंतर मल्टिप्लेक्स प्रदर्शनाचा निर्णय घेतला आहे.
मल्टिप्सेक्स थिएटर्समध्ये सिनेमा लावल्यानंतर एकूण उत्पादनातला 50 टक्के वाटा सिनेमा निर्मात्यांना दिला जातो, असा नियम आहे. हिंदी सिनेमांसाठी हा नियम मल्टिप्लेक्स मालक पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न करतात.
'टाइमपास 2' सिनेमाला मल्टिप्लेक्स मालकांनी 48 ते 50 टक्के वाटा द्यावा अशी मागणी एक्सेल व्हिजनने केली होती. तीन दिवस चाललेल्या या वाटाघाटीनंतर मल्टिप्लेक्स मलाकांनी आपले हे धोरण न सोडल्याने 'टाइमपास 2' मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करणार नसल्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सिनेमातील काही खास सीन्स...