आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदम नया है यह!!! PICSमध्ये पाहा दगडू-प्राजूच्या \'टाइमपास 2\'ची खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('टाइमपास 2'मधील छायाचित्रे)

रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास 2' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. गेल्यावर्षी आलेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या टाइमपास या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या सिनेमात प्राजू आणि दगडू आता मोठे झाले असून सिनेमाचे कथानक 15 वर्षे पुढे सरकले आहे. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट या सिनेमात मेन लीडमध्ये असून पहिल्या भागात झळकलेले प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांचेही दर्शन सिनेमात घडणारेय. शिवाय 'शाकाल' या नावाने प्रसिद्ध झालेले वैभव मांगलेदेखील या सिनेमाचा अविभाज्य भाग आहेत. मुंबई आणि कोकणमध्ये सिनेमाचे शूटिंग पार पडले आहे.
या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा झक्कास आयटम नंबर प्रेक्षकांना बघायला मिळणारेय. 'मदन पिचकारी' हे शब्द असलेल्या गाण्यावर सोनालीसोबत प्रिया बापटसुद्धा थिरकली आहे.
पंधरा वर्षांनी दगडू आणि प्राजक्ता एकमेकांना भेटतात का? त्याचं पुन्हा प्रेम होतं का? की पहिल्यासारख्या फक्त यातना मिळतात? हे सगळं येत्या 1 मे रोजी पडद्यावर पाहणं रंजक ठरणारेय.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'टाइमपास 2'ची खास झलक...