आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'TIMEPASS 2' चा दुसरा ट्रेलर रिलीज, शाकालच्या विरोधाला झुगारुन दगडू-प्राजक्ता एकत्र येणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'टाइमपास' सिनेमाचा सिक्वेल असलेल्या 'टाइमपास 2' या सिनेमाचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये इमोशनचा तडका देण्यात आल्याचे दिसून येतंय. येत्या शुक्रवारी म्हणजे 1 मे रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट मेन लीडमध्ये आहेत. तर टाइमपासमध्ये झळकलेली प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर ही जोडीही या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.
शाकाल अर्थातच प्राजूच्या वडिलांच्या विरोधाला झुगारुन दगडू-प्राजक्ता या वेळेस तरी एक होणार की पुन्हा दुरावणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा 'टाइमपास 2' चा दुसरा ट्रेलर...