आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

It\'s Party Time: ‘टाइमपास 2’च्या टीमने केली जल्लोषात पार्टी, केक कापून झाले सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेलिब्रेशनच्या मूडमध्ये सिनेकलावंत)

‘टाइमपास 2’ सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर चित्रपटाच्या स्टारकास्टने बुधवारी मुंबईत जल्लोषात पार्टी करून आपला आनंद साजरा केला. यावेळी चित्रपटाचे निर्माते नितीन केणी, निखील साने आणि मेघना जाधव यांच्यासह दिग्दर्शक रवी जाधव आणि चित्रपटाची स्टारकास्टही उपस्थित होती.
'टाइमपास 2' हिट झाला तो, दगडू-प्राजक्ताच्या आगळ्या प्रेमकहाणीमुळे आणि ‘नया है वह’सारख्या संवादांमुळे. 'टाइमपास' आणि 'टाइमपास 2' मध्ये दिसलेला प्रथमेश परब आणि वैभव मांगले यांच्यासह नवे ‘दगडू-प्राजक्ता’ प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट तर या संपूर्ण सेलिब्रेशनची जानच होते. पण त्याचसोबत तंत्रज्ञांसोबतच चित्रपटाशी निगडीत जवळजवळ 40 कलावंत पार्टीला हजर होते.
1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'टाइमपास 2' ने चार आठवड्यातच प्रेक्षकांना ‘वेड लावले’ आणि आत्तापर्यंत अंदाजे 28 कोटी रूपये कामवलेत. आजकाल कोटीच्या कोटी उड्डाणे घेणा-या मराठी चित्रपटांच्या यादीत आता या सिनेमाला तिसरं स्थान मिळालंय. त्यामुळे या चित्रपटाची विक्रमी कमाई अशी केक कापून साजरी करण्यात आली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ‘टाइमपास 2’च्या टीमच्या सेलिब्रेशनची खास झलक...