आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'टाइमपास\' सीरिजचा तिसरा चित्रपट बनवण्याची जबाबदारी - रवी जाधव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(केक कापून सेलिब्रेशन करताना 'टाइमपास 2'ची टीम)
'टाइमपास' बनल्यानंतर लगेच दुस-या वर्षी 'टाइमपास 2' ही आला. पहिल्या सिनेमाप्रमाणेच दुस-याही सिनेमाने घवघवीत यश मिळवलं. यानिमित्ताने नुकतीच चित्रपटाच्या टीमने जल्लोषात पार्टी करुन मिळालेल्या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शक-कलाकारांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केलं, आपलं मनोगत.

रवी जाधव – (चित्रपटाचे दिग्दर्शक)
जाहिरात क्षेत्रातनं जेव्हा सिनेमा बनवण्याचं ठरवलं तेव्हा एका पाठोपाठ चक्क पाच चित्रपट मी बनवले. पण आता लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि ‘व्हॉट नेक्स्ट’ या प्रश्नांना मला तोंड द्यावं लागतं. ज्याचं उत्तर माझ्याकडेही नसतं. लोकांनी तर 'टाइमपास 3'ची कथा आणि गाणी स्वत:च लिहीलीय आणि ते सोशल मीडियावरनं फिरतंय. पण जर आता 'टाइमपास'ची तिसरी फिल्म बनवायची असेल तर खूप जबाबदारीने बनवायला हवी.
पुढे वाचा, काय म्हणातेयत प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव...