(छायाचित्रेः दिग्दर्शक रवी जाधव, 'टीपी 2'ची टीम आणि रवी जाधव यांचे फेसबुक स्टेटस.)
गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'टाइमपास' या सिनेमातील दगडू आणि प्राजक्ताच्या लव्हस्टोरीने मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली. अवघ्या तीन आठवड्यात या सिनेमाने 30 कोटींचा गल्ला जमविला आणि मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास निर्माण केला. 'टाइमपास'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी 'टीपी 2'ची घोषणा केली. तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच सिनेमा थिएटरमध्ये दाखल होईल.
सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी 'टीपी 2'च्या संपूर्ण टीमसोबत एक्सेल व्हिजन, झी मराठी, झी टॉकीज, अथांश कम्युनिकेशन या सर्वांचे आभार व्यक्त केले. इतकेच नाही तर यावर्षी 1 मे रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचेही स्पष्ट केले.
शूटिंगच्या शेवटच्या दिवशी रॅप अप पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत 'टीपी 2' संपूर्ण टीमने भरपूर धमाल मस्ती केली. डान्स, मजा-मस्तीत ही पार्टी रंगली. यावेळी अनेक कलाकार सेल्फी मूडमध्ये दिसले. या पार्टीची छायाचित्रे कलाकारांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत.
कलाकारांची हीच धमालमस्ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा टीपी 2च्या रॅपअप पार्टीची खास झलक...
(फोटो साभारः फेसबुक)