आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुमा कुरैशीच्या पहिल्या मराठी फिल्ममध्ये टिस्का चोप्रा जाणून घ्या, तिला कसा मिळाला ‘हायवे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या मराठी चित्रपटांमध्ये होणा-या नवनव्या प्रयोगांमुळे, आणि त्यांना मिळणा-या आंतराष्ट्रीय सन्मानांमुळे बॉलीवूड आता मराठीची दखल घेऊ लागलंय. बॉलीवूड दिग्दर्शक, निर्मात्यांना मराठी चित्रपट बनवावेसे आणि पहावेवेसे वाटत आहेत. तर अभिनेता, अभिनेत्रींना मराठी चित्रपटांचा हिस्सा व्हावेसे वाटते आहे. ‘तारे जमीन पर’ फेम अभिनेत्री टिस्का चोप्रा आता आपल्याला गिरीश कुलकर्णी लिखीत आणि उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे’ या आगामी चित्रपटांत दिसणार आहे.
हा चित्रपट तिला कसा मिळाला याबद्दल divyamarathi.comला सांगते, “उमेशच्या घरी एक संगीतसंध्या आयोजित केली होती. तिथे मी गेले होते. पण आम्ही त्यादिवशी काहीच बोललो नाही. मला वाटलं उमेश तर फारच वैचारिक दिग्दर्शक आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्यासारख्या अभिनेत्रीला पाहिलेही नसेल. आणि काही दिवसांनी मला जेव्हा कळले की त्यांना मला भेटायचे आहे. तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. उमेशने त्याच्या घरी गेलेल्या मला त्यादिवशी पाहिलं होतं. आणि त्याला माझ्यासोबत फिल्मही करायची होती. नंतर जेव्हा उमेश माझ्या घरी फिल्मची स्क्रिप्ट घेऊन आला, तेव्हा तर ती जाडजूड स्क्रिप्ट मी पाहतच राहिले. एवढ्या मोठ्या चित्रपटात आपल्याला काम कारायचं? असा प्रशन मनात निर्माण झाला असतानाच, उमेशने मला चित्रपटाचे कथानक ऐकवले. ते ऐकण्यात मी एवढी गुंग होऊन गेले की त्यात साडेचार तास कसे गेले मला कळलेच नाही. आणि उमेशची ‘हायवे’ची कथा मला एवढी आवडली की मी लगेच हो म्हणून टाकले. मला असं वाटतं, की ह्या चित्रपटाला भाषिक चित्रपटाच्या विभागात बंदिस्त न करता, ह्याला वल्डसिनेमा म्हटलं पाहिजे. एखाद्या कुंभाराने मातीचा घडा हळूहळू आपल्या सृजनशील हातांनी घडवावा, तसाच उमेशही आपल्या फिल्मला आकार देतो. आणि हेच त्याचे वेगळेपण आहे, असे मला वाटते. तो कधी तुम्ही चित्रीत केलेला सीन खूप सुंदर होता, आणि तुम्ही किती छान अभिनय करता, अशी स्तुतीसुमनं उधळतं, उगाच अभिनेत्याला खुश करण्याच्या फंदात पडतं नाही. तो तुम्ही दिलेल्या चांगल्या शॉटला अजून काही सुंदर बनवता येईल का, याच्या शक्यता पडताळू लागतो. फक्त चित्रीकरणातच नाही. संकलन करतानाही त्याची सर्जनशीलता काही वेगळं करण्याच्या तयारीत असते. तो फिल्ममेकिंगला एक प्रक्रिया समजतो. मी केलेल्या चित्रपटांमध्ये हा माझा नक्कीच आवडता चित्रपट आहे.“
टिस्का चोप्रा या चित्रपटात हिंदी बोलणार आहे. पण तिच्या अनुसार, उमेश कुलकर्णीसोबत काम करायला मिळणार म्हटल्यावर भाषा हा मुद्दाच नव्हता. ती याबद्दल सांगताना पूढे म्हणते,” उमेशसोबत काम करताना मराठी जरी बोलायला लागली असती, तरीही मी बोलले असते. कारण मला उमेशसोबत काम करायचंच होतं. मी देऊळ पाहिली होती. आणि त्याच्या डोक्यात एखाद्या कलाकृतीला निर्माण करताना असलेला अभ्यास, वेगळा दृष्टिकोण,एखादी कठीण गोष्ट सोप्पी करून मांडण्याची शैली, मला आवडली. त्याची चित्रभाषा मांडण्याची पध्दत एवढी सरळ आणि साधी आहे की, कोणत्याही कलाकारालाच नाही तर सर्वसामान्य चित्रपट रसिकालाही त्याच्या चित्रपटांची भूरळ पडते.”
‘हायवे’ चित्रपट २४ जुलैला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.
पूढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, टिस्काचा 'हायवे' चित्रपटातला लूक आणि फस्ट लूक लाँचचे फोटो.