आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखा पाहू : ही चिमुकली आहे मराठी-हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्याची \'एकुलती एक\' मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणा-या या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? काय म्हणता, नाही... चला तर मग आम्हीच तुम्हाला हिची ओळख करुन देतो. ही आहे अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया यांची लाडकी लेक श्रिया पिळगावकर. मराठी सिनेसृष्टीत श्रिया पिळगावकर हे नाव आणि तिचा चेहरा आता अनोळखी राहिलेला नाही. अभिनयातील समर्थ जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या कन्येने सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून तर पदार्पण केले आहेच, शिवाय दिग्दर्शिका म्हणूनही ती नावारुपास येतेय. रंगभूमीवरसुद्धा ती रमते.
आज श्रियाचा आज वाढदिवस आहे. तिचे वडील सचिन यांनी स्वतः सोशल साइटवर श्रियाचे वरील छायाचित्र शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी श्रियाने सचिन पिळगावकर यांचीच निर्मित असलेल्या ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमातील श्रियाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. श्रियाने आपल्या करिअरची सुरुवात 'पेटेंड सिग्नल' (2012) आणि 'ड्रेसवाला' (2013) या शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून केली होती.
रंगभूमीवर रमते...
श्रियाने दोन इंग्रजी नाटकांमध्ये काम केलंय. अॅक्वेरिअस प्रॉडक्शन्सच्या 'कॉमन पीपल' आणि 'इंटर्नल अफेअर्स' ही दोन इंग्रजी नाटकं गेल्यावर्षी रंगभूमीवर आली. विनोदी शैलीची ही नाटकं करताना रंगभूमीवरच्या कामाचा अनुभव खूपच आनंददायी आणि शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू ठेवणारा असल्याचे श्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते.
अनुराग बसूसोबत काम करण्याची संधी...
दिग्दर्शक अनुराग बसूची निर्मिती असलेल्या 'रिअल एफ एम' या टेलीफिल्मचे दिग्दर्शन तिने केले आहे. या सिनेमाची कथा अनुरागचीच आहे, मात्र त्याचे दिग्दर्शन आकर्ष खुराणा याने केले. या सिनेमासाठी सेकंड युनिट दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी श्रियाला मिळाली.
किंग खानसोबत झळकणार...
किंग खान शाहरुखच्या आगामी ‘फॅन’ या सिनेमाद्वारे श्रिया बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेत आहे. श्रियाची भूमीका लहान असली तरी महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.
ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या फ्रेंच सिनेमात श्रियाची वर्णी...
श्रिया पिळगावकर आता चक्क एका फ्रेंच सिनेमात चमकणार आहे. ऑस्कर विजेता दिग्दर्शक क्लॉड लेल्यूश यांच्या आगामी 'अ प्लू युन' या फ्रेंच सिनेमात श्रिया दिसेल. दोन प्रेमकहाण्या सांगणा-या या रोमँटिक सिनेमात ती पाहुण्या कलाकाराच्या मात्र महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. मुंबईतल्या एका अभिनय कार्यशाळेत तिचा अभिनय बघून या प्रोजेक्टच्या ऑडिशनसाठी तिला बोलावण्यातलं आलं होतं. तिचं काम आवडल्यानं तिला हा आंतराराष्ट्रीय सिनेमा मिळाला. या आंतरराष्ट्रीय सिनेमात ती एका भारतीय अभिनेत्रीचीच भूमिका करतेय.
आज श्रियाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिचा खास अंदाज छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...