आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीतील Top 8 अॅक्ट्रेस, एका फिल्मसाठी घेतात लाखो रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री आपल्या टॅलेंट आणि ग्लॅमरच्या बळावर बॉक्स ऑफिसवर सिनेमे हिट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यापैकी अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचे सिनेमे रिलीज होण्यापूर्वीच लाइमलाइटमध्ये असतात. फीस घेण्यातदेखील या अभिनेत्री मागे नाहीत. एका सिनेमासाठी अगदी एक लाखापासून ते वीस लाखांपर्यंतचे मानधन अभिनेत्री घेतात. सई ताम्हणकर घेते सर्वाधिक मानधन...

मराठी इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई एका सिनेमासाठी 15 ते 20 लाख रुपये घेते. सई पाठोपाठ सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रीचे नाव आहे सोनाली कुलकर्णी. सोनाली एका सिनेमासाठी 15 ते 18 लाख रुपये चार्ज करते.
सई ताम्हणकर
- सांगली (महाराष्ट्र) मध्ये जन्मलेल्या सईने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये दोन डझनहून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.
- बारावीत असताना सईने एका नाटकात काम केले होते, तेथून तिच्या करिअरला टर्निंग पाईंट मिळाले आणि आज सई मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
- 2008 मध्ये आमिर खान स्टारर 'गजनी' आणि सुभाष घईंच्या 'ब्लॅक अँड व्हाइट' या हिंदी सिनेमांमध्ये सई झळकली आहे.
- मोठ्या पडद्यावर बिकिनी परिधान करणारी सई पहिली मराठी अभिनेत्री आहे.
- सईने सध्या तिचा आगामी सिनेमा 'वजनदार'मुळे प्रकाशझोतात आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी सईने तब्बल 10 किलो वजन वाढवले आहे.
- हंटर या हिंदी सिनेमातही तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- सईने 2013 मध्ये बॉयफ्रेंड अमेय गोसावीसोबत लग्न केले असून ती मुंबईत स्थायिक आहे.
सोनाली कुलकर्णी
- मुळची पुण्याची असलेल्या सोनालीने गिरीश कर्नाड यांच्या 'चेलुवी' या कन्नड सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती.
- सोनालीने आत्तापर्यंत सात भाषांमधील 60 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. याशिवाय मराठी फिल्म आणि टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली आहे.
- 1992 मध्ये 'चेलुवी' या कन्नड सिनेमासाठी गिरीश कर्नाड यांनी तिला पहिल्यांदा सिनेमाची ऑफर दिली होती. त्याकाळात सोनाली कॉलेजमध्ये शिकत होती. शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी तिने सरुवातीला फिल्मची ऑफर नाकारली होती.
- 'फुओको दी सू' या इटॅलियन सिनेमासाठी सोनालीला 2006 साली मिलन फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- सोनाली कुलकर्णी यशस्वी अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी कॉलमिस्टदेखील आहे. 'सो कूल' नावाचे तिचे सदर खूप गाजले.
- हिंदीत तिने दिल चाहता है, मिशन काश्मिर या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. याशिवाय 'डरना जरुरी है', 'दिल-विल, प्यार-व्यार', 'प्यार तूने क्या किया' आणि 'सिंघम' हे तिचे गाजलेले आणखी काही हिंदी सिनेमे आहेत.
- मराठीत 'कैरी', 'घराबाहेर', 'देवराई', 'दोघी', 'मुक्ता', 'सखी', 'अगं बाई अरेच्चा 2' आणि 'देऊळ' हे तिचे गाजलेले मराठी सिनेमे आहेत.
- यशस्वी अभिनेत्री असलेल्या सोनालीला खासगी आयुष्यात अनेक चढउतारदेखील पाहावे लागले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींसोबत तिचे पहिले लग्न झाले होते. मात्र हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर 2010 मध्ये सोनालीने फॉक्स टीव्हीचे एमडी नचिकेत पंचवैद्यसोबत दुसरे लग्न थाटले. नचिकेत आणि सोनाली यांना एक मुलगी असून कावेरी हे तिचे नाव आहे.

नोटः (सर्व अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडा प्रति सिनेमानुसार आहे. मानसी नाईक आणि स्मिता गोंदकर यांच्या मानधनाचा आकडा ऑगस्ट 2014च्या आकड्यांनुसार आहे.)

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, मराठी अभिनेत्री आणि त्यांच्या मानधनाविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...