आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा नवा महापौर मुंबईकरांचे स्वप्न साकार करणार का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अधिकारी बदलले, की सूत्र देखील बदलतात. या बदलत्या सूत्रांचा परिणाम सामान्य नागरिकांवर आणि त्याबरोबरच शहरावर देखील होत असतो. राज्यात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. खास करून  मुंबई शहराच्या आर्थिक उलाढाली सांभाळणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे सूत्र अनेक काळापासून निरंतर सुरु आहे. नुकतीच विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाली असून, त्यांचा नवा कार्यकाल शहराला लागू होणार आहे. अधिकाराची ही खांदेपालट सामान्य जीवनात कशा पद्धतीने परिणाम करते, याचे वास्तव 'ट्रकभर स्वप्न' या आगामी सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

अभिनेते, चित्रपट- कलादिग्दर्शक, दिग्दर्शक तसेच निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले नितीन चंद्रकांत देसाई लोकांना प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे देण्याचा  प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न त्यांनी 'ट्रकभर स्वप्न' या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. 

आयकॉनिक चंद्रकांत प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली सादर होणारा हा सिनेमा एका महत्वाकांक्षी तरुणाच्या जीवनावर भाष्य करतो. सरकारी खात्यातील बदलत्या नियमांची झळ सामान्य कुटुंबावर कशी पडते, यावर हा सिनेमा बेतला आहे. 
बातम्या आणखी आहेत...