(गाण्याचे शूटिंग करताना तेजस्विनी पंडीत, स्वप्नील जोशी आणि सुशांत शेलार)
फिल्ममेकर संजय जाधव आणि लव्ह स्टोरी असं समीकरणच तयार झालंय. संजय जाधव आता प्रेमाचा त्रिकोण घेऊन येत आहेत, यांच्या आगामी 'तू हि रे' सिनेमामधनं. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित आणि स्वप्निल जोशीची मुख्य भूमिका असणा-या या चित्रपटाचं शुटिंग सध्या मुंबईत सुरू आहे.
नुकताच यात लग्नाचा एक सिक्वेन्स शुट करण्यात आला. ज्यासाठी भव्य सेट उभारण्यात आला होता. आणि या चित्रपटात ‘गुलाबाची कली’ गाणं आहे. ज्याच्या चित्रीकरणाचे हे फोटो divyamarathi.com वर आपण पाहत आहात.
लग्नाच्या सिक्वेन्समधलं हे गाणं तेजस्विनी पंडित, स्वप्निल जोशी आणि सुशांत शेलारवर चित्रीत करण्यात आलंय. हे कलरफुल गाणं गायलंय, अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर या तिघांनी.
जसं 'दुनियादारीत'लं 'जिंदगीं...' हे गाणं, लोकांच्या ओठी रूळलं.. आणि जशी 'प्यारवाली लव्हस्टोरी'मधली कव्वाली रसिकांना भावली. तसंच हे गाणं सुध्दा धमाल करेल असा निर्मात्यांचा विश्वास आहे.
तेजस्विनी, स्वप्नील आणि सुशांत यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्यात अमिजराज, वैशाली आणि उर्मिला यांची झलक आपल्याला पाहता येणार आहे. 'तू हि रे' हा सिनेमा यावर्षी 4 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गाण्याच्या ऑन लोकेशनची झलक...