Home | Bollywood | Marathi Cinekatta | tu tithe asave marathi movie starcast bhushan pallavi

‘तू तिथे असावे’ चित्रपटातून भूषण-पल्लवीची फ्रेश जोडी येणार प्रेक्षकांसमोर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 05, 2017, 05:35 PM IST

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी

  • tu tithe asave marathi movie starcast bhushan pallavi
    वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अशीच एक हटके जोडी 'तू तिथे असावे' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघं या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा 'तू तिथे असावे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.

    जगण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी व्यक्त केला. आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल, हे सांगता येत नाही अशावेळी हताश न होता आयुष्य कसं जगावं या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या विषयाचा चित्रपट म्हणजे 'तू तिथे असावे'. भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांच आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहीतोष सरदारे आहेत.
    पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाच्या सर्व टीमचा खास PHOTO...

  • tu tithe asave marathi movie starcast bhushan pallavi

Trending