आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रांतवादातील अलवार प्रेमकथा ‘तुझ्या विन मरजांवा’...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटातून आपल्याला महाराष्ट्र आणि पंजाब अशी लव्हस्टोरी बघायला मिळाली होती. आता पुन्हा तशीच एक लव्हस्टोरी ‘तुझ्या विन मरजांवा’ या चित्रपटाच्या रूपाने १२ जून रोजी प्रदर्शित होत आहे. पंजाबची मुलगी आणि महाराष्ट्रातील मुलगा यांची ही प्रेमकथा आहे. पुन्हा या चित्रपटालाही अवधूत गुप्ते यानेच संगीत दिले आहे.
‘तुझ्या विन मरजांवा’ हा चित्रपट म्हणजे अनिकेत आणि निशाची एक हळवी रोमँटिक कथा आहे. अनिकेत आणि निशा हे दोघेही पुण्यातील एकाच कॉलेजमध्ये शिकतात. दोघांमध्ये खूप प्रेम असतं, पण निशाचे वडील जे चंदीगडमध्ये एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांना निशाच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती पडतं आणि तिला ते परत चंदीगडला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करतात. तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात महाराष्ट्रातील कुलकर्णी या व्यक्तीकडून फसविण्यात आलेलं असते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा राग असतो. निशाचे लग्न ठरते तेव्हा अनिकेत त्याच्या आईला, काकांना आणि मित्रांना घेऊन निशाच्या घरी जातो. पुढे त्यांच्या प्रेमाला संमती मिळते का की, त्यांच्या प्रेमाचे बलिदान द्यावे लागते हे बघणे चित्रपटात मजेशीर असल्याचे या चित्रपटाच्या कलाकारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत विकास पाटील, प्रार्थना बेहरे, प्रतीक्षा लोणकर आणि अतुल परचुरे आहेत. तर, दिग्दर्शन मुरली नल्लपा यांनी केले आहे. गीते मंदार चोळकर, वैभव जोशी यांची असून, संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत.