Home »Bollywood »Marathi Cinekatta» Tuzyat Jeev Rangala Fame Actor Hardik Joshi Meet Raj Thackeray

'राज'दरबारी पोहोचला 'राणा', लाडक्या नेत्याची भेट घेण्याचे स्वप्न झाले साकार

दिव्य मराठी वेब टीम | Mar 15, 2017, 11:54 AM IST

मुंबईः झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी. मुळचा मुंबईचा असलेला हार्दिक मालिकेच्या निमित्ताने सध्या कोल्हापुरात असतो. होळीच्या निमित्ताने शूटिंगपासून सुटी घेऊन हार्दिक त्याच्या मुंबईतील घरी आला होता. सोमवारी रंगपंचमीचा आनंद लुटल्यानंतर हार्दिकने आपल्या आवडत्या राजकीय नेत्याची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर जाऊन हार्दिकने त्यांची भेट घेतली आणि होळीच्या शुभेच्छा दिल्या.

हार्दिक जोशी कॉलेजमध्ये असताना राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वानं त्याच्या मनावर गारूड केलं होतं. राज यांचं रुबाबदार राहणं आणि बोलण्याच्या स्टाइलवर तो फिदा आहे. राज ठाकरेंना भेटायची त्याची तेव्हापासूनच इच्छा होती. अखेर ती सोमवारी पूर्ण झाली. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, असं हार्दिकनं राज ठाकरेंना सांगितलं. या भेटीत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.

पुढे बघा, 'राज'भेटीची हार्दिकची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या हार्दिकविषयी...

Next Article

Recommended