आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे \'पाठकबाईं\'चा ख-या आयुष्यातील \'राणा\', हिच्या एका हास्यावर फिदा होतात चाहते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - छोटा पडदा हा सध्याच्या घडीला प्रत्येक घरातील अविभाज्य भाग बनला आहे. त्यातही मराठी मालिकांचा विचार करता अनेक मालिका या घरातील लहान थोरांच्या आवडीच्या बनल्या आहेत. अशाच सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेली मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव गुंतला'. या मालिकेची नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. गेल्यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी या मालिकेचा पहिला भाग आपल्या भेटीला आला होता. वर्षपूर्तीच्या निमित्ताने मालिकेतील सर्व कलाकारांनी सेटवर केक कापून  सेलिब्रेशन केले.
 
या मालिकेतील राणा आणि अंजलीच्या तर प्रत्येक जण जणू प्रेमात पडलेला दिसतो. राणा आणि अंजलीची हळूवार प्रेमकहाणी सगळ्यांनाच भावली आहे.  या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीने राणा तर अक्षया देवधर हिने अंजलीची भूमिका साकारली आहे. पडद्यावर हार्दिकसोबत रोमान्स करणा-या अक्षयाचा ख-या आयुष्यातील राणा कोण हे तुम्हाला ठाऊक आहे का? 
 
होय, ख-या आयुष्यातसुद्धा अक्षया प्रेमात पडली आहे आणि तिचा हा प्रियकर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचासुद्धा आहे. 'का रे दुरावा' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुयश टिळकसोबत अक्षया रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचे एकमेकांसोबतचे अनेक फोटोज अक्षया आणि सुयश यांच्या सोशल मीडिया अंकाउंटवरसुद्धा बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुयशसोबतचा एक फोटो पोस्ट करुन त्याला ‘मिसिंग यू सुयश टिळक … लव्ह’ असे कॅप्शन दिले होते. तर सुयशनेदेखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षयासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट करुन 'मिस यू टू...' असे कॅप्शन दिले होते. या फोटोजवरुन 'आग दोनो तरफ बराबर लगी है...' असंच काहीसं दिसून आलं होतं. दोघांनी एकाप्रकारे सार्वजनिकरित्या आपल्या रिलेशनशिपची जणू कबुलीच दिली होती. 
 
पुढे वाचा, अक्षयाविषयी काय म्हणतो सुयश... आणि हो सोबतच बघा, अक्षयाचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...