आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: ख-या आयुष्यातही विवाहित आहेत \'राणा\'च्या\'वहिनीसाहेब\', ग्लॅमरस अंदाज वेधून घेतो लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तुझ्यात जीव रंगला’ या छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगांवकर अल्पावधीत घराघरांत प्रसिद्ध झाली आहे. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणा-या नंदिता वहिनींना झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट खलनायिकेसाठी नामांकन मिळाले आहे. धनश्रीने साकारलेल्या नंदिताच्या भूमिकेत अस्सल ग्रामीण ठसका बघायला मिळतो. भूमिकेला ग्रे शेड असला तरी धनश्रीने ही भूमिका वेगळ्या उंचीवर नेली आहे. नंदिताची भूमिका राणा-अंजलीच्या प्रेमकहाणीत तडक्याचे काम करते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 
 
ख-या आयुष्यात विवाहित आहे धनश्री काडगांवकर... 
मालिकेत सूरजच्या पत्नीची भूमिका वठवणारी अभिनेत्री धनश्री काडगांवकर ही ख-या आयुष्यातसुद्धा विवाहित आहे. ध्रुवेश देशमुख हे तिच्या पत्नीचे नाव आहे. धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले. हे अरेंज्ड मॅरेज आहे. ध्रुवेश धनश्रीपेक्षा वयाने चार वर्षांनी मोठा आहे. 10 ऑक्टोबर 1984 ही ध्रुवेशची तर 6 एप्रिल 1988 ही धनश्रीची जन्मतारीख आहे.  
 
उच्चशिक्षित आहे धनश्री...
धनश्रीचे शिक्षण पुण्यातच झाले. गरवारे कॉलेज ऑफ कामर्स येथून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर IMCC येथून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी प्राप्त केली. 
 
आईच्या आग्रहामुळे रिअॅलिटी शोमध्ये झाली सहभागी...  
झी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिअॅलिटी शोमधून धनश्री घराघरांत पोहोचली. खरं तर या शोमध्ये सहभागी होण्याचा धनश्रीची विचार नव्हता. पण आईच्या आग्रहामुळे ती या शोमध्ये सहभागी झाली आणि 24 स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर धनश्री या शोच्या टॉप 10 स्पर्धकांमध्ये पोहोचली.    
 
धनश्रीच्या मालिका...
'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मुळे धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमध्ये झळकली. 
 
रंगभूमीवर केले काम...
'झोपी गेलेला जागा झाला' आणि 'आधी बसू मग बोलू' या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे. 

मोठ्या पडद्यावर झाले धनश्रीचे पदार्पण... 
दासबाबू दिग्दर्शित 'ब्रेव्हहार्ट' या चित्रपटातून धनश्रीची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. याचवर्षी रिलीज झालेल्या या चित्रपटात अभिनेता संग्राम समेळसोबत धनश्री झळकली होती. 
 
सोशल मीडियावर असते अॅक्टिव... 
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर धनश्री अॅक्टिव आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल 1 लाख 43 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नित्यनेमाने स्वतःविषयी, मालिकेविषयी अपडेट्स आणि  विविध फोटोज या माध्यमातून शेअर करत असते. अलीकडेच तिने तिचे ऑफिशिअल ट्विटर अकाउंटसुद्धा सुरु केले आहे. 
 
या पॅकेजमधून बघुयात, धनश्रीची तिच्या रिअल लाइफ 'सूरज'सोबतची आणि शिवाय ग्लॅमरस अंदाज दाखवणारी  खास छायाचित्रे...
 
बातम्या आणखी आहेत...