आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानापमानाच्या नाटकात रंगला राणा-अंजलीचा विवाहसोहळा, बघा पडद्यामागचे क्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली यांचा रविवारी विवाहसोहळा पार पडला. थोरली सुनबाई म्हणून मिरवणारी नंदिता अर्थातच वहिनीसाहेब हिने केलेल्या मानापमानाच्या नाटकात राणा-अंजलीचे लग्न झाले. नंदिता हिला थोरल्या सूनबाईचा मान मिळावा यासाठी राणाने लग्नानंतर अंजलीसोबत वाडा सोडून शेतात राहण्याचा  निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अंजली या सर्व प्रसंगांना कसे तोंड देईल हे मालिकेच्या येणा-या भागांमध्ये बघणे रंजक ठरणार आहे. 
 
प्रेक्षकांना लागले होते राणा-अंजलीच्या लग्नाचे वेध...
राणा आणि अंजली प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. यांच्या प्रेमकथेची सुरुवात, राणाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, अंजलीला भावलेला त्याचा साधेपणा या सर्व गोष्टींमध्ये प्रेक्षक समरसुन गेला. या दोघांच्या लग्नाचे वेधच जणू प्रेक्षकांना लागले होते. अखेर साध्या पद्धतीने राणा आणि अंजलीचा विवाहसोहळा पार पडला.  
 
नंदिता वहिनी रचणार कटकारस्थानं... 
नंदिता वहिनीच्या मनात आता वेगळाच कट शिजतोय. घरात थोरली सून आल्यानंतर आपलं महत्त्व कमी होईल आणि सगळी सूत्रं अंजलीकडे जातील याची भीती तिला वाटतेय. त्यामुळेच तिने मानापमानाचे नाटक करुन अंजलीला वाड्यात येऊ दिलेले नाही. भोळ्या स्वभावाच्या राणाच्या स्वभावाचा फायदा घेत नंदिताने भविष्यातदेखील नवीन डाव आखणार हे काही वेगळे सांगायला नको.  
 
लग्नातून दिला साधेपणाचा संदेश
गावाकडचं लग्न म्हटलं, की रंगरंगोटी, रोषणाई, आतषबाजी, मान मरताब  या गोष्टी ओघाने येतातच आणि सोबत येतो तो त्यावर होणारा भरमसाठ खर्च. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न सोहळ्यावर अमाप खर्च करण्याची पद्धत गावांत, शहरांत सगळीकडेच आहे. हा अवाजवी खर्च खरंच एवढा गरजेचा असतो की साधेपणानेसुद्धा  लग्नसमारंभ पार पडू शकतात असाच काहीसा संदेश राणा-अंजलीच्या लग्नातून देण्यात आला आहे. राणाची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची सधनता, गावात असलेली प्रतिष्ठा हे सगळं मोठं असलं तरी हे लग्न मात्र ते अत्यंत साध्या पद्धतीने लागले. 
 
राणा-अंजलीच्या लग्नाचे खास क्षण बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...