आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदिताने ठसक्यात दिल्या मामांजीना वाढदिवसाच्या शुभेच्छा, बघा काय म्हणाताहेत वहिनीसाहेब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मामांजीसोबत वहिनीसाहेब नंदिता - Divya Marathi
आपल्या मामांजीसोबत वहिनीसाहेब नंदिता

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अंजली आणि नंदिता यांच्या सास-याची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद दस्ताने यांचा आज (8 ऑगस्ट) वाढदिवस आहे. मालिकेत वहिनीसाहेब अर्थातच नंदिताच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने मिलिंद दस्ताने यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन नंदिता स्टाइलने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
कोल्हापुरी ठसक्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वहिनीसाहेबांनी लिहिले, "थोरलेपनाच्या नावाखाली आमच्या कडनं लै कामं करून घ्यायलासा मामंजी तुमी.. पन आमीबी काई कमी न्हाई.. उत्तमराव जाधवांची लेक हाय.. थोरलेपना काय असतो ते अमास्नी चांगलं माहिती.. त्याच थोरलेपनानं आज तुमास्नी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.. अजून मोठ्ठ मंत्री व्हा.. अजून जमिनी इकत घ्या.. लै लै शुभेच्छा.."  

गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर अल्पावधीत घराघरात प्रसिद्ध झाली आहे. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणण्याचे काम नंदिता करत असते. मामांजींसमोर मात्र तिची फारशी चलती नसते. मोजूनमापूनच ती त्यांच्यासमोर वागत असते. कटकारस्थान रचण्यात आघाडीवर असलेली नंदिता उर्फ धनश्री सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव आहे. 

पाहुयात, सास-यांना कोल्हापुरी ठसक्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणा-या नंदिताचे 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवरील काही खास फोटो... 
बातम्या आणखी आहेत...