आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'होणार सून..\'च्या सेटवर सत्यनारायण पूजा, पाहा, सेटवरचं दोन वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालिकेच्या सेटवर झाली सत्यनारायण पूजा
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेने दोन वर्ष पूर्ण केले आहेत. १५ जुलै २०१३ला ही मालिका सुरू झाली, आणि श्री-जान्हवीची लव्हस्टोरी आणि सहा सासवांच्या एकुलत्या एक सूनेची कथा सांगणा-या ह्या मालिकेला पाहता पाहता, दोन वर्ष कशी उलटली ते प्रेक्षकांना उमगलंच नाही. दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मालिकेच्या सेटवर नुकतच सत्यनारायणाच्या पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी जान्हवी आणि तिच्या सहा सासूबाई पूजेला उपस्थित असल्या तरीही श्री मात्र उपस्थित नव्हता. मलिकेचा दिग्दर्शक मंदार देवस्थळी, तेजश्री प्रधान, रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते, लीना भागवत, सुप्रिया पाठारे, पुर्णिमा तळवलकर, स्मिता सरवदे, अतुल परचुरे या मालिकेच्या कलावंतासह मालिकेचे रोमॅंटिक गाणे गाणारा गायक मंगेश बोरगांवकर, आणि संगीतकार निलेश मोहरीर सुध्दा उपस्थित होते. त्याचप्रमाणे ‘होम मिनिस्टर’ आदेश बांदेकर यांनी सुध्दा सत्यनारायण पुजेला उपस्थिती लावली होती.
मालिकेचा दिग्दर्शक मंदार देवस्थळी ह्या दोन वर्षपूर्तीबद्दल सांगतो,” असं वाटतंय की, कालच तर शुटिंग सुरू केलं होते आपण. विश्वासचं बसतं नाहीये, की दोन वर्ष पूर्ण होतायत. ५०० भाग होवो, नाही तर १००० भागांकडे वाटचाल होवो. सेटवरचं वातावरण पहिल्या दिवसासारखंच खेळीमेळीच असतं.श्री-जान्हवी खूप लोकप्रिय झालेत. आणि दरवेळेस त्यांची आणि मालिकेची प्रसिध्दी पाहता, लोकांच्या अपेक्षांचं एक ओझं मनावर असतंच. आणि त्या अपेक्षापूर्ती साठी आम्ही सगळेच रोज झटत असतो.”
मध्यंतरी श्री-जान्हवीच्या बाळाचं गुपित आणि जान्हवीने ‘काहीही हं श्री’ म्हणण्यावर बरेच विनोद फिरू लागले होते. सोशल नेटवर्किंग साइट्स आणि व्हॉट्सअप वरून ह्याविषयी चर्चा रंगल्या होत्या. त्याविषयी मंदारला विचारल्यावर तो म्हणतो,”हो, आम्हांलाही असे मेसेजेस यायचे. मग आम्ही ते सेटवर वाचून दाखवायचो. आणि एकमेकांचं मनोरंजन करायचो. आणि हेच तर प्रतिक आहे, मालिकेच्या लोकप्रियतेचे. त्यामुळे हे सगळे मेसेजेस आम्ही खूप एन्ज़ॉय करतो.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मालिकेच्या दोन वर्षांच्या प्रवासाबद्दल काय म्हणतेय, जान्हवी