‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ठ मालिका आणि सर्वोत्कृष्ठ जोडीसह तब्बल ९ पुरस्कारांवर ‘का रे दुरावा’ मालिकेने आपलं नाव कोरलंय. तर ‘जय मल्हार’मधील खंडोबाने सर्वोत्कृष्ट नायकाचा आणि म्हाळसा-बानूने सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. ज्यांना आपली फॅमिली नाही, अशा दोस्तांच्या कुटूंबाला ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा सर्वोत्कृष्ट कुटुंबाचा अवॉर्ड मिळाला.
सर्वोक्कृष्ठ नायकांमध्ये श्री, जय, नील आणि खंडोबा ह्यांच्यामध्ये स्पर्धा होती. ह्यामधून खंडोबाने बाजी मारली. तर जान्हवी, अदिती, स्वानंदी, म्हाळसा आणि बानू ह्यांना स्रवोतृष्ठ नायिकेची नॉमिनेशन्स मिळाली होती. ज्याच बानू आणि म्हाळसाला नायिकेचे पारितोषिक देण्यात आले.
सर्वोत्कृष्ठ कुटूंबासाठी -
जहागिरदार आणि देशपांडे कुटुंब (नांदा सौख्य भरे),
खानोलकर कुटुंब (का रे दुरावा)
गोखले कुटुंब (होणार सुन मी ह्या घरची)
‘दिल दोस्ती दुनियादारी’ (दोस्तांचे कुटुंब)
‘चला हवा येऊ द्या’ (थुकरटवाडी कुटुंब)
अशी नॉमिनेशन होती. ज्यामधून दिल दोस्तीच्या टीमला अवॉर्ड मिळाले.
सर्वोत्कृष्ठ मालिकेसाठी -
‘का रे दुरावा’,
‘जय मल्हार,’
‘नांदा सौख्य भरे’,
‘होणार सून मी ह्या घरची’,
‘अस्मिता’
‘दिल दोस्ती दुनियादारी’
ह्यामधून ‘का रे दुरावा’ जिंकली.
(फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणतायत जय-आदिती आणि खंडोबा-म्हाळसा आणि बानू पुरस्कारमिळाल्यावर