आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive: रूपाली पाठोपाठ स्वप्नालीचंही झालं लग्न? जाणून घ्या, स्वप्नालीच्या लग्नाचं गुपित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नालीचेही झाले दूसरे लग्न ?
‘पुढचं पाऊल’मध्ये रूपाली-रोहितचे पून्हा एकदा लग्न होणार, हे तर divyamarathi.comने नुकतेच तुम्हांला सांगितले आहे, पण आता हे जे तुम्ही फोटो पाहातायत, हे त्याच लग्नावेळचे आहेत. रूपालीच्या लग्नातच स्वप्नालीचे लग्न होते आहे की काय, असे भासवणारे आहेत.
याबाबत अभिनेत्री स्वप्नाली पाटील म्हणते,“स्वप्नालीचे हे खरेखुरे लग्न नाही आहे. स्वप्नाली आजही आपल्या नव-याला सोहम सरदेशमुखला विसरू शकलेली नाही. खरं तर, रूपालीचं लग्न पाहत असताना तिला, तिचं स्वत:च लग्न आठवतंय. हा ड्रीम सिक्वेन्स आहे. रूपालीच्या लग्नात मंडपाचे कॉन्ट्रॅक्ट घेणा-या बंटी मिश्राला स्वप्नाली आवडलेय. पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडलाय. त्याच मांडवात स्वत:चे स्वप्नालीसोबतचे लग्न तो पाहतो. असा सिक्वेन्स आहे.”
रूपालीच्या लग्नात नवी एन्ट्री झालेला हा बंटी मिश्रा म्हणजे आहे, लेखक आणि अभिनेता अभिजीत गुरू आहे. अभिजीतने गेली चार वर्ष ह्या मालिकेचे संवादलेखन केले आहे. पहिल्या भागापासून आत्तापर्यंत सर्व एपिसोड्स लिहीणारा ‘पुढचं पाऊल’चाच लेखक आता अभिनेता होऊन ह्यात आपल्यासमोर येत आहे.
अभिजीत ह्यासंदर्भात सांगतो,”सध्या मी ‘तळ्यात मळ्यात’ नाटक करतोय. त्या नाटकासाठी मी केस वाढवलेत. आणि त्यामूळे मी थोडा उत्तर भारतीय वाटतोय, असे सेटवरच्या लोकांचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच शेवटी क्रिएटीव्ह टिमने माझीच बंटीच्या भूमिकेतून एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.”
आता लेखकच समोर आल्यावर divyamarathi.comने मालिकेतला पूढचा ट्रॅकही त्याच्याकडून जाणून घेतला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय होणार पुढचं पाऊलमध्ये येत्या तीन महिन्यांत?