आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive: ‘पुढचं पाऊल’मध्ये रूपाली करतेय लग्न, पाहा, रूपाली-रोहितच्या लग्नाचा थाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पुढचं पाऊल'मध्ये रोहित-रूपालीचं लग्न
‘पुढचं पाऊल’मध्ये रूपालीमूळे नेहमीच टेन्शन निर्माण झालेले आपण पाहिले आहे. सतत कटकट, आणि कारस्थानं करणारी, कल्याणीला त्रास देणारी, आक्कासाहेबांच्या डोक्याला ताप देणारी, रूपाली गेल्या कित्येक भागांमधून खलनायिकेच्या रूपातच दिसलीय. पण रूपालीच्या नापिक डोक्यात ह्यावेळी मात्र चक्क एक सुपिक कल्पना आलीय. ज्यामुळे सरदेशमुख कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे.
जसा आक्कासाहेबांच्या लग्नाचा २५वा वाढदिवस, त्यांचे लग्न पून्हा एकदा लावून साजरा करण्यात आला. तसाच माझ्याही लग्नाचा वाढदिवस माझेही पून्हा एकदा थाटात लग्न लावून साजरा करण्यात यावा, ही रूपालीची मागणी आक्कासाहेबांनी मान्य केलीय. आणि आता रूपाली आणि रोहितचं लग्न लागलंय.
Divyamarathi.com ह्या लग्नात व-हाडीमंडळींसोबत सामिल झालं होतं. त्यावेळी नटलेलं सरदेशमुख कुटूंब आणि या कुटूंबियांचे सेटवरचे वेगवेगळे मूड्सही टिपता आले. सुंदर पिवळ्या वधूवस्त्रात, नववधूचा साज ल्यायलेल्या, रूपालीच्या चेह-यावरचं चक्क हसू पाहून, आता ही येणा-या वादळाची सूचना तर नाही ना? असा प्रश्न पडला होता.
रूपालीची भूमिका करणारी शर्मिला शिंदे याबद्दल म्हणाली, “कट-कारस्थान? अजिबात नाही. गेले ९५० एपिसोड्समध्ये पाहायला मिळाली नसेल, अशी रूपाली तुम्हांला ह्या भागात पाहायला मिळेल. रूपालीला नेहमीच ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ व्हायला आवडतं. आणि आता चक्क आक्कासाहेब तिची मागणी मान्य करून तिचं लग्न होतंय म्हटल्यावर तर ती खूश असणारच ना.. त्यामूळे ती सध्या हे सगळं एन्जॉय करेल.रूपाली दुस-यांच्या आनंदात विघ्न आणते. स्वत:च्या आनंदात मुळीच विघ्न आणू शकणार नाही.”
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, आक्कासाहेब आणि कल्याणी काय सांगतायत, रूपाली बद्दल