आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा उमा भेंडेंच्या सून-मुलाला, सून प्रसिद्ध अभिनेत्री तर मुलगा आहे सिनेमॅटोग्राफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे आज (19 जुलै) आज दुपारी साडे बाराच्या सुमारास निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1960 साली 'आकाशगंगा' या चित्रपटातून उमा भेंडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, भालू, स्वयंवर झाले सीतेचे हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी, छत्तीसगढी आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
 
 
उमा भेंडे यांच्या पश्च्यात पती प्रकाश भेंडे, मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे, सुना श्वेता महाडिक-भेंडे आणि किमया भेंडे, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांचा थोरला मुलगा आणि सून हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.
 
जाणून घेऊयात, उमा भेंडे यांच्या थोरल्या सूनबाई आणि मुलाविषयी..
 
प्रसाद आहे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर 
उमा आणि प्रकाश भेंडे यांच्या थोरल्या मुलाचे नाव प्रसाद भेंडे आहे. प्रसाद हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. 'दुनियादारी' या सिनेमामुळे प्रसाद प्रसिद्धीझोतात आला. 'दुनियादारी' या सिनेमातून प्रसादचे सिनेमॅटोग्राफर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण झाले. पहिल्याच सिनेमासाठी अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. 'दुनियादारी'नंतर 'मितवा', 'लोकमान्य', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'वेलकम जिंदगी', 'पेइंग घोस्ट' आणि इतर अशा बड्या सिनेमांसाठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. 'लोकमान्य' सिनेमासाठी त्याने सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळवला. 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' हा आगामी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 
 
उमा आणि प्रकाश भेंडे यांनी प्रसादच्या जन्मानंतर श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू केली होती. या निर्मितीसंस्थेतून त्यांनी भालू, चटकचांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची निर्मिती केली होती.
 
पुढे वाचा, हिंदी-मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे उमा भेंडेंची थोरली सून...