आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Chocolate Hero उमेश कामत बनला Angry Young Man पाहा, त्याच्या Underworld Filmचा First Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमनाथ चित्र निर्मित सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘मुंबई टाइम’ ह्या चित्रपटाचा फस्ट लूक नुकताच युट्युबवर लाँच झालाय. ह्या फस्ट लूकवरून ही फिल्म अंडरवल्ड, टोळी युध्दाविषयी असल्याचं दिसून येतंय.
चित्रपटात उमेश कामत मुख्य भुमिकेत आहे. तर उमेशशिवाय मृणाल दुसानिस, राहूल मेहेंदळे, रमेश भाटकर, किशोर चौगुलेसुध्दा फिल्ममध्ये दिसतील. चित्रपटात अमर सुर्वेच्या भुमिकेत असलेल्या उमेशला पाहून हा अंडरवल्ड डॉन मन्या सुर्वे आहे का असा पटकन प्रश्न पडतो.
मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणतात, “मन्याचा आणि अमरचा काही संबंध नाही. दोघांचीही आडनाव सुर्वे आहेत एवढंच. मन्या सुर्वेवरच्या ‘शुट आऊट एट वाडाला’मध्ये तुम्ही त्याची प्रेमिका पाहिली होती. पण ह्या चित्रपटात अमर सुर्वेला बायको आहे. मृणाल दुसानिसने अनुराधा ह्या त्याच्या पत्नीची भुमिका केलीय. भाईची बायको असलेली ही अनुराधा घरेलू असली तरीही खूप मॅच्युअर्ड आहे.”
आपल्या चित्रपटाचे वेगळेपण सांगताना दिग्दर्शिक सुश्रुत भागवत म्हणतात, “ही मराठीतली पहिली अंडरवल्डवरची एक्शन फिल्म आहे. अंडरवॉटर एक्शन सिक्वेन्सेस सुध्दा ह्यात आम्ही चित्रीत केलेत. असे सिक्वेन्स मराठीत कधीच पाह्यला मिळाले नाहीत. काही गुन्हेगारी जगतातल्या घटना घेऊन त्यांचा कोलाज करून मी ह्या फिल्ममध्ये दाखवल्या आहेत. अंडरवल्डने मुंबई आणि कालांतराने देशावर राज्य केलंय. अनेक मराठी तरूण नैराश्यापोटी ह्या गुन्हेगारीविश्वाच्या गर्तेत ओढले गेले. तसाच हा अमर सुर्वे आहे. स्वत:च्या तत्वांवर ठाम असलेला हा डॉन आहे.”
सुश्रुत भागवतच्या ‘पेइंग घोस्ट’ चित्रपटाचा हिरोसुध्दा उमेश कामतच होता. पून्हा एकदा ही दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी ह्याही चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. त्याविषयी बोलताना सुश्रुत म्हणतात,” उमेश हा ‘मेथड एक्टर’ आहे. तो कोणत्याही भुमिकेत लिलया शिरकाव करून त्या भूमिकेला न्याल देतो. आणि तो शोभूनही दिसतो. मी त्याच्यासोबत ‘पेइंग घोस्ट’ केला. तेव्हा मी एक साधा सरळ, बिचारा उमेश दाखवला. तर आता त्याच्या अगदी विरूध्द भूमिकेत तुम्हांला तो दिसेल.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुंबई टाइम चित्रपटाचा फस्ट लूक टिझर
बातम्या आणखी आहेत...