आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unknown Facts : दहावीत प्रियाला होते 78% गुण, 11वीत असताना मिळाला होता \'मुन्नाभाई एमबीबीएस\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिया बापटचे बालपणीपासून ते आतापर्यंतचे विविध लूक - Divya Marathi
प्रिया बापटचे बालपणीपासून ते आतापर्यंतचे विविध लूक
मराठी सिनेसृष्टीची आघाडीची नायिका प्रिया बापट हिच्या फिल्म्स आणि टीव्ही मालिकांविषयी तिच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे.  'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'काकस्पर्श', 'हॅपी जर्नी', 'टाइमप्लीज', 'टाइमपास2', 'वजनदार' हे प्रियाचे गाजलेले चित्रपट आहेत. पण प्रियाची अभिनय क्षेत्रातील पदार्पण कसे झाले, तिचे शिक्षण कुठवर झाले आहे. तिला संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली हे तुम्हाला ठाऊक आहे का? अभिनेत्रीसोबतच प्रिया एक चांगली गायिकादेखील आहे. आज प्रेक्षकांच्या लाडक्या प्रियाचा वाढदिवस असून तिने वयाच्या 32 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आज तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, प्रियाच्या काही खास गोष्टी. 
 
मुळची मुंबईची आहे प्रिया..
आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रिया बापट मुळची मुंबईची आहे. शरद बापट हे प्रियाच्या वडिलांचे तर स्मिता हे आईचे नाव आहे. अलीकडेच प्रियाच्या वडिलांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहे. प्रियाच्या आईवडिलांचे लग्न उशीरा झाले. लग्नाच्या वेळी तिचे वडील 44 वर्षांचे तर आई स्मिता या 35 वर्षांच्या होत्या. प्रियाला एक थोरली बहीण असून श्वेता हे तिचे नाव आहे. श्वेता स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर असून प्रियासाठी ती ड्रेस डिझाइन करत असते.  
 
पुढे वाचा, सहावीत असताना केला पहिला चित्रपट.. यांसह प्रियाविषयी बरंच काही... सोबतच बघा, प्रियाचे बालपणीपासून ते लेटेस्ट लूकचे फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...