आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : पहिला रंगीत सिनेमा होता \'पिंजरा\', संध्या यांनी स्वतः केली होती कोरिओग्राफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पिंजरा’ ... त्यो कुनाला चुकलाय ?
अवो मानसाचं घर तरी काय असतं?
त्योबी एक पिंजराच की!

हे तत्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि
“व्यक्ती मेली तरी चालेल पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत”
या महान तत्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा म्हणजे...पिंजरा.
सत्तरच्या दशकात आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित 'पिंजरा' या सिनेमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या सुंदर कलाकृतीचा जादू आता पुन्हा एकदा सिनेरसिकांना अनुभवण्याची संधी मिळाली आहे. 18 मार्च रोजी हा सिनेमा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला हा सिनेमा 31 मार्च 1972 रोजी रिलीज झाला होता. आता तब्बल 44 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर नव्या अंदाजात बघण्याची संधी सिनेरसिकांना मिळाली आहे.
पुरुषोत्त्म लढ्ढा आणि सौ चंद्रसेना पाटील यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रॉडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेत प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करत तिचे २ के स्कॅनिंग करत नवी अद्यावत प्रिंट तयार केली. हॅंड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, ऑडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, ऑडिओ रीस्ट्रोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे.
'पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतीक, आत्मीक व सामाजीक अध:पतनाची कथा आहे.
44 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाशी निगडीत पडद्यामागच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्यापासून सिनेरसिक अनभिज्ञ आहेत. म्हणूनच या सिनेमाशी निगडीत रंजक गोष्टी आम्ही तुमच्यासाठी या रिपोर्टमधून घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुम्हाला ठाऊक नसलेल्या या खास गोष्टी...