आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे गवसले नागराज मंजुळेंना \'सैराट\', \'फँड्री\'तील अभिनयातील हे हिरे, जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय वठवला आहे. आकाश ठोसर, रिंकू राजगुरु, तानाजीसह सिनेमातील जवळजवळ सर्वच कलाकार नवोदित आहेत. मात्र या कलाकारांचा अभिनय पाहून ते नवोदित आहेत, असं कुणालाही वाटणार नाही. खरं तर ही कला दिग्दर्शकाचीच. नागराज मंजुळे यांनी प्रत्येक कलाकारातील लपलेला अभिनय हेरुन तो उत्तमरित्या पडद्यावर आणला आहे.

नागराज मंजुळे कायम आपल्या कलाकृतीत नॉन अॅक्टरला घेऊन एक उत्कृष्ठ गोष्ट सादर करतात आणि त्यांचा हा सिलसिला अगदी 'पिस्तुल्या'पासून सुरू आहे. 'फॅंन्ड्री'तील जब्या असो प-या असो वा शालू या तिघांनाही नागराज यांनीच शोधले. विशेष म्हणजे 'पिस्तुल्या'मधील सुरज, 'फँड्री'तील जब्या आणि आता 'सैराट'मधील रिंकू या तिघांनीही राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.
'फँड्री'त जब्याची भूमिका करणारा सोमनाथ अवघडे, त्याच्या मित्राची भूमिका साकारणारा प-या अर्थातच सूरज पवार आणि जब्याचं जिच्यावर मनापासून प्रेम आहे ती शालू म्हणजेच राजेश्वरी खरात या तिन्ही मुलांनी आपल्या अभिनयाने सिनेमात जीव ओतला. जब्या, प-या आणि शालू आणि 'सैराट'मधील आर्ची, परशा या कलाकारांची निवड होणं, हा खूप रंजक प्रवास आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना उत्कृष्ट अभिनय केलेल्या अभिनयातील या हि-यांना नागराज यांनी कसे शोधले, याचा आढावा घेणारा आमचा हा खास रिपोर्ट...

या कलाकारांची सिनेमासाठी निवड कशी झाली हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...