आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे प्रार्थनाचा 'स्वप्नातील राजकुमार', जाणून घ्या त्याच्याविषयी सर्वकाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मराठी इंडस्ट्रीची आघाडीची नायिका प्रार्थना बेहरे लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नासाठी प्रार्थनाने 14 नोव्हेंबरचा मुहूर्तसुद्धा फायनल केला. प्रार्थनाचा होणारा पती कोण असेल, तो फिल्म इंडस्ट्रीतील आहे की नाही हे जाणून घेण्यास नक्कीच सगळेच उत्सुक असतील. अभिषेक जावकर हे प्रार्थनाच्या जोडीदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे अभिषेकसुद्धा फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असून तो दिग्दर्शक आहे. या महिन्यात दोघांचा साखरपुडा आहे. 

प्रार्थना-अभिषेकचे आहे अरेंज्ड मॅरेज...
अभिषेक आणि प्रार्थनाचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असून देखील दोघांची ओळख नव्हती. मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. याविषयी प्रार्थना सांगते, "अभिनेत्यासोबत लग्न करायचे नाही, हे मी सुरुवातीपासूनच ठरवले होते. मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून आमची भेट झाली.लग्नासाठी 14 नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित झाला आहे. आमचे डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे." लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीत काम सुरु ठेवणार असल्याचे प्रार्थना सांगते. भविष्यात हिंदी सिनेमांकडे लक्ष केंद्रित करण्याचे तिने ठरवले आहे. 

जाणून घेऊयात, प्रार्थनाच्या होणा-या नव-याविषयी सर्वकाही..  
बातम्या आणखी आहेत...