आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आर्ची\'ने सोडली शाळा, वाचा \'सैराट\'च्या हीरो-हिरोईनविषयीच्या 11 गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैराट या तुफान प्रसिद्धी लाभलेल्या सिनेमातील मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने शाळा सोडल्याची बातमी आहे. रिंकू आता दहावीत शिकत आहे. मात्र सैराटमुळे मिळालेल्या प्रसिद्धीने तिला सार्वजनिक ठिकाणी वावरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पण ती शिक्षण सोडणार नाहीये. शाळेत गेल्यावर मुलांची तिच्याच भोवती जास्त गर्दी वाढते. त्यामुळे तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिंकूच्या वडिलांनी तिच्यासाठी एसएससीचा 17 नंबरचा फॉर्म भरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यामुळे ती तिची 10 वीची परिक्षा बाहेरुनच देणार आहे अशी चर्चा आहे.
सैराट सिनेमामुळे रिंकूचे आयुष्यच बदलून गेले आहे. या सिनेमाचे कथानक जसे रोचक आहे तसेच त्यातील प्रमुख दोन पात्रे म्हणजेच आर्ची आणि परशाची रिअल लाईफ स्टोरी. आर्ची तर अगदी शाळकरी मुलगी आहे. परशाला पैलवान व्हायचे होते. पण दोघांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. दोघे आता स्टार झाले आहेत. या दोघांशी संबधित काही पडद्यामागची माहिती.
या सिनेमातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजे आकाश ठोसर यांना शोधण्यापासून, त्यांच्याकडून काम करवून घेण्यापर्यंत नागराज मंजुळे यांनी सर्वकाही एकहाती केले. 'सैराट'मधून रिंकू आणि आकाश हे नवोदित एका रात्रीतून स्टार झाले. मात्र भविष्यात अभिनेत्री नव्हे तर डॉक्टर व्हायची तिची इच्छा आहे. 'सैराट'च्या रिलीजनंतर रिंकू आता दहावीच्या अभ्यासाकडे लक्ष देणार आहे.
'सैराट'मध्ये रिंकू आणि आकाश यांच्या निवडीमागे रंजक कथा आहे. कसा आहे रिंकू आणि आकाशचा सिनेमाविषयीचा अनुभव, जाणून घेऊयात पुढील स्लाईड्समध्ये...
(टीप- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुकच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही ही माहिती शेअर करा.)
बातम्या आणखी आहेत...