आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unseen Pics: लॉ ग्रॅज्युएट आहे \'काहे दिया परदेस\'मधली \'उर्मिला\', रिअल लाईफमध्ये आहे ग्लॅमरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मालिकांपैकी 'काहे दिया परदेस' या मालिकेचा उल्लेख होतो. मराठी आणि हिंदी संस्कृतीची दर्शन घडवणा-या या मराठी मालिकेतील अनेक कलाकार हे हिंदी भाषिक आहे. सायली संजीव, मोहन जोशी, शुभांगी गोखले,  समीर खांडेकर या मराठी कलाकारांसोबतच ऋषी सक्सेना, शहनवाज प्रधान, माधुरी संजीव हे हिंदी कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या हिंदी कलाकारांमध्ये आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख होतो. ती म्हणजे शिवची बहीण उर्मिला. ही भूमिका साकारणा-या अभिनेत्रीचे नाव भाव्या मिश्रा आहे. 

मुळची भोपाळची आहे भाव्या..
भाव्या मुळची भोपाळची आहे. तिचे शिक्षण ग्वाल्हेरच्या किड्स कॉर्नर हायर सेकंडरी स्कूलमधून झाले. विशेष म्हणजे भाव्या लॉ ग्रॅज्युएट आहे. पण अभिनयाची आवड असल्याने ती रंगभूमीकडे वळली. अनेक नाटकांमध्ये तिने अभिनय केला आहे. आता छोट्या पडद्यावरील काहे दिया परदेस या मालिकेत ती उर्मिला ही व्यक्तिरेखा साकारत आहे. स्ट्रेट फॉर्वर्ड असलेल्या भाव्याला भटकंतीची आवड असून, चित्रपट आणि पुस्तकांविषयी पॅशनेट असल्याचे ती सांगते.  

सोशल मीडियावर अॅक्टिव... 
मालिकेत साडी आणि सलवार सूटमध्ये वावरणारी भाव्या खासगी आयुष्यात मात्र अतिशय ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती अॅक्टिव आहे. तिच्या फेसबुक अकाउंटवर तिचे ग्लॅमरस लूकचे अनेक फोटोज बघायला मिळतात.
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'उर्मिला'चे हेच अनोखे रुप दाखवत आहोत. भाव्याचा ग्लॅमरस अंदाज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...    
बातम्या आणखी आहेत...