आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश-जिनिलियाचा नवा चित्रपट \'फास्टर फेणे\', मराठी सेलेब्स करत आहेत हटके प्रमोशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांपासून मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार सोशल मीडियावर ‘फ’च्या बाराखडीचा व्हिडिओ पोस्ट करत आहेत. गिरीजा ओक गोडबोले, ललित प्रभाकर, शिवानी रंगोले, मिथिला पालकर, स्वानंदी टिकेकर, सुव्रत जोशी, सखी गोखले, अमृता खानविलकर, अभिनय बेर्डे या कलाकारांनी सोशल मीडियावर #FaFe या हॅशटॅगसह ‘फ’च्या बाराखडीचा व्हिडिओ पोस्ट केला. विशेष म्हणजे त्यांच्या या व्हिडिओजला सोशल मीडियावर भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत.
 
कलाकार ‘फ’ची बाराखडी का म्हणत आहेत, याचा उलगडा अखेर झाला आहे. ‘फास्टर फेणे’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा हटके फंडा वापरण्यात आलाय. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांची ही नवी निर्मिती आहे.
 
अलीकडेच जिनिलियाने या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट करुन लिहिले, "भा. रा. भागवत यांच्या स्मृतीला अभिवादन करून घेऊन येत आहोत त्यांचा मानसपुत्र, एका नव्या काळात, नव्या रूपात आणि नव्या कथेत!" तर स्वतः रितेश देशमुखनेही फची बाराखडी म्हणतानाचा व्हिडिओ पोस्ट करुन चित्रपटाची रिलीज डेट रिव्हील केली आहे.
 
येत्या 27 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून अमेय वाघ आणि पर्ण पेठे ही फ्रेश जोडी चित्रपटात मेन लीडमध्ये झळकणार आहे. 

‘फास्टर फेणे’ हे प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी जिवंत केलेलं एक लोकप्रिय पात्र. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजलेलं. बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. 
 
पाहुयात, झी स्टुडिओज आणि रितेश देशमुख प्रस्तूत आणि जिनिलिया देशमुख-मंगेश कुलकर्णीची निर्मिती असलेल्या 'फास्टर फेणे' या चित्रपटाचे पोस्टर आणि सोबतच मराठी सेलेब्सनी शेअर केलेले खास व्हिडिओज पुढील स्लाईड्सवर... 
 
 
बातम्या आणखी आहेत...