आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा 'सिद्धांत', पाहा Teaser

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळा, अनुमती, फॅन्ड्री अशा एकाहून एक सरस कलाकृती तयार करणा-या 'नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल' या निर्मिती संस्थेच्या आगामी सिनेमाचे नाव आहे 'सिद्धांत'. नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्यासोबत अमित अहिरराव यांनी 'सिद्धांत' या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून 'सिद्धांत' सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या 16व्या 'मामी' फिल्म फेस्टिवलच्या 'इंडिया गोल्ड 2014' विभागात करण्यात आली आहे. येत्या 14 ऑक्टोबरपासून 21 ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे. नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात, त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणितासारख्या पद्धतीशी मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा 'सिद्धांत' सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे. सिनेदिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल असून 'शाळा' सिनेमाची निर्मिती तसेच आजवर अनेक सिनेमांसाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
'सिद्धांत' सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शेखर ढवळीकर यांनी या सिनेमासाठी पटकथा- संवाद लिहिले असून सिनेमातील गाणी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी लिहिली आहेत. संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून नुकतेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा 'सिद्धांत' या सिनेमाचा टीजर...