आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही आहे \'एरिअल सिल्क\' मध्ये पारंगत असलेली पहिलीच मराठी अॅक्ट्रेस, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरिअल सिल्क डान्सप्रकार करताना अभिनेत्री उर्मिला कानिटकर - Divya Marathi
एरिअल सिल्क डान्सप्रकार करताना अभिनेत्री उर्मिला कानिटकर
मुंबई - प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर आज तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्याला नेहमीच भेटणारी उर्मिला मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर अभिनेत्री समजली जाते. 'शुभमंगल सावधान', 'आईशप्पथ', 'दुनियादारी', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. यासोबतच मराठी मालिका 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची' यामध्येही तिने काम केले आहे. तर 'मायका', 'मेरा ससुराल' या हिंदी मालिकांमध्ये ती दिसून आली. 
 
उर्मिलाला सतत काहीतरी शिकत राहायला फार आवडते. उर्मिला ही उत्तम नृत्यांगना आहे हे आपणास माहित आहेच पण 'एरिअल सिल्क' हा नृत्यप्रकार शिकणारी ती पहिलीच मराठी अभिनेत्री आहे. आज वाढदिवसानिमित्त तिच्या या छंदाविषयी आपण अधिक जाणून घेऊया.
 
अशी झाली एरिअल सिल्क शिकण्यास सुरुवात..
 
उर्मिला कानिटकरची जवळची मैत्रीण फुलवा खामकरची मुलगी आदिती देशपांडे यांच्याकडे हा डान्सप्रकार शिकायला जायची. तिला तो डान्सप्रकार करताना पाहून उर्मिला आदितीला बोलून गेली, 'मलाही माझ्या आईवडिलांनी असे काही शिकविले असते तर मीसुद्धा असे परफॉर्म करु शकली असती.' त्यानंतर आदितीने उर्मिलाला प्रोत्साहित केले आणि नंतर आदितीनेही या नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात केली.
 
वाचा पुढील स्लाईडवर, नेमका काय आहे 'एरिअल सिल्क' डान्सप्रकार..
 
 
बातम्या आणखी आहेत...