आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिला मातोंडकराचा मराठमोळा ठसका, बघा 29 व्या पुणे फेस्टिव्हलचे खास PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणेः बॉलिवूड आणि मराठी स्टार्सच्या मांदियाळीत संगीत, नृत्य, नाट्य, कला, वादन, गायन, क्रिडा आणि संस्कृती यांचा मनोहारी संगम असलेल्या 29 व्या पुणे फेस्टिव्हलचे शुक्रवारी ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या कार्यक्रमाला अभिनेते शेखर सुमन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, पुनम धिल्लन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
या सोहळ्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सादरीकरण केले. मराठमोळ्या रुपात उर्मिला मंचावर अवतरली होती. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने गणेशवंदना सादर केली. पूजा सावंत, नेहा महाजन, तेजस्विनी लोणारी, भार्गवी चिरमुले यांच्यासह अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात बहारदार सादरीकरण केले. 
 
या कार्यक्रमात नृत्य सादर करण्यापूर्वीचे काही फोटोज उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोजमध्ये गुलाबी रंगाच्या नऊवारीत उर्मिलाच्या दिलखेचक अदा लक्ष वेधून घेणा-या आहेत. 

पाहुयात, उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोजसोबत पुणे फेस्टिव्हल 2017ची छोटीशी झलक...       
 
बातम्या आणखी आहेत...