एन्टरटेन्मेंट डेस्कः चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पिंजरा' या सिनेमाच्या रिलीजला यावर्षी मार्च महिन्यात 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. संध्या आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाला 1972 साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढ्या वर्षांनंतरही या सिनेमाची जादू मुळीच कमी झालेली नाही. संगीत, अभिनय, दिग्दर्शन सर्वच बाबतीत हा सिनेमा आजही वाखाणल्या जातो. या सिनेमाची लोकप्रियता बघून गेल्यावर्षी 18 मार्च रोजी हा सिनेमा नव्या अंदाजात पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. ‘पिंजरा’ हा सिनेमा मराठी सिनेमांबरोबरच संध्या यांच्या कारकिर्दीसाठीही फार महत्त्वपूर्ण ठरला होता.
'पिंजरा'मध्ये या सिनेमात नर्तकी चंद्रकलाची व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री संध्या व्ही. शांताराम यांच्या तिस-या पत्नी असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का... विशेष म्हणजे व्ही. शांताराम यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना या शांताराम यांच्या भाची होत्या. व्ही. शांताराम यांची नातवंडसुद्धा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.
आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला व्ही. शांताराम यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा व्ही. शांताराम यांच्या कुटुंबीतील सदस्यांना...