आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:नयनरम्य ठिकाणी आहे व्ही. शांताराम यांचे पन्हाळ्यातील घर, आता मुलीने बदलले रिसॉर्टमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेते, दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटसृष्टीचा पाया रोवणारे व्ही. शांताराम यांची उद्या 116वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. व्ही शांताराम म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांपुढे नाव येते ते पिंजरा या चित्रपटाचे. आजपर्यंत या चित्रपटाच्या तोडीचा तमाशाप्रधान चित्रपट आला नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केले होते. पण उत्तम दिग्दर्शकच नाही तर ते उत्तम अभिनेतेही होते. आज त्यांच्या बर्थ अॅनिवर्सरीनिमित्त खास तुमच्यासाठी त्यांच्या पन्हाळा येथील घराचे काही फोटो घेऊन आलो आहोत. मुलीने बदलले घर रिसॉर्टमध्ये...

 

पन्हाळा येथे व्ही. शांताराम यांचे वास्तव्य होते. 30 ऑक्टोबर 1990 साली त्यांचे निधन झाल्यावर त्यांची मुलगी सरोज यांनी त्यांच्या या घराची देखरेख केली. आता हे घर पन्हाळा येथील बेस्ट रिसॉर्ट म्हणून प्रसिद्ध झाले आहे. पन्हाळा येथील नयनरम्य अशा जागी असलेल्या या रिसॉर्टमध्ये नेहमीच लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पन्हाळा येथील व्ही. शांताराम यांच्या घराचे काही सुंदर फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...