झी मराठीवरील मेघना आणि आदित्य आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. अर्थातच 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 500 हून अधिक एपिसोड देणा-या या मालिकेतील सध्याच्या ट्रॅकनुसार, पुण्याला गेलेले मेघना आणि आदित्य आता मुंबईत परतले आहेत. शिवाय विजया आणि मेघना यांच्या नात्यात आलेली कटुताही निवळत चालली आहे. एकंदरीतच काय तर मालिकेत आता ऑल इज वेल होणारेय. त्यानुसार मालिका बंद करण्याची नोटीस चॅनलकडून मालिकेच्या निर्मात्यांना जारी करण्यात आली आहे.
आता या मालिकेची जागा कोणती नवी मालिका घेणार याची उत्सुकता तुम्हाला लागली असणार ना... मेघना, आदित्य, माई, नाना यांच्याजागी आता अभिनेता वैभव मांगले आपल्या भेटीला येणार आहेत ते ही स्त्रीरुपात. सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता 'पती माझे सौभाग्यवती' ही नवी मालिका सुरु होत असून वैभव मांगले स्त्रीवेशात दिसणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. तर 25 सप्टेंबरपासून ही नवी मालिका सुरु होणार आहे. या नव्या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे या मालिकेसाठी वैभव मांगले यांनी आपले साडे पाच किलो वजन कमी केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, वैभव मांगलेंच्या नवीन मालिकेचा खास प्रोमो...