आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : प्रेमाच्या पावसात चिंब भिजवायला आले आहे \'भेटली तू पुन्हा\'चे ट्रेलर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
असं म्हणतात एखादी व्यक्ती आवडली तर पहिल्याच नजरेत आवडते. पहिल्याच भेटीत तिच्याशी जन्मोजन्मीचे नाते निर्माण होते. या पहिल्याच नजरेत घडणाऱ्या प्रेमाबद्दल खूप काही लिहिले, बोलले गेले आहे. प्रेम जरी आयुष्यात एकदाच होत असलं तरी एकाच व्यक्तीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याची जादू काही औरच असते आणि म्हणूनच स्वरूप रीक्रिएशन अँड मिडीया प्रा. लिमिटेड प्रस्तुत, गणेश हजारे निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट खास आहे. ‘भेटली तू पुन्हा’च्या ट्रेलरद्वारे दुसऱ्या नजरेत घडणाऱ्या प्रेमाची नशा अनुभवायला मिळत आहे.

प्रेमात पडण्यासाठी तुमचे सूर जुळायला लागतात. मग प्रेमकथा तरी नादमधुर गाण्यांशिवाय पूर्ण कशी होईल!  ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच संगीतदेखील तितकेच श्रवणीय आहे. चित्रपटात एकूण 5 गाणी असून जी शब्दबद्ध केली आहेत मंगेश कांगणे आणि संजय जमखंडी यांनी आणि संगीतबद्ध केली आहेत चिनार–महेश या द्वयीने. ‘जानू जानू’ हे गाणे वैभव आणि पूजावर चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटाचे ‘भेटली तू पुन्हा’ हे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे विवेक देऊळकर यांनी. या सर्व गीतांना स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, निखील मोदगी आणि सिद्धार्थ महादेवन यांचा आवाज लाभला आहे.  

वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत अशी फ्रेश जोडी असणारा हा चित्रपट मुंबई ते गोवा या प्रवासादरम्यान फुलणाऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे. अतिशय फ्रेश दिसणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण प्रदीप खानविलकर यांनी केले असून संकलन सतीश पाटील यांचे आहे. आणि पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांच्या लुकचे श्रेय जाते संतोष गावडे यांना. प्रेम या संकल्पनेला पुन्हा नव्याने भेटवणारा हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...