आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: जाणून घ्या कशी मिळाली या हॅण्डसम अॅक्टरला अवधुत गुप्तेंची फिल्म आणि बरंच काही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रताप सरनाईक निर्मित आणि अवधुत गुप्ते दिग्दर्शित ‘कान्हा’ हा मराठी सिनेमा गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात दोन अभिनेत्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'कॉफी आणि बरंच काही' फेम अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि 'देऊळ बंद' सिनेमातील अभिनेता गश्मीर महाजनी हे दोन हॅण्डसम हंक या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाचा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. कान्हा या सिनेमाच्या शीर्षकावरुन हा सिनेमा दहीहंडीवर आधारित असणार हे लक्षात येते.
या सिनेमात 'मल्हार'ची भूमिका वैभव तत्ववादीने तर 'रघु'ची भूमिका गश्मीर महाजनीने साकारली आहे. या दोघांच्या सोबतीला गौरी नलावडे, किरण करमरकर, प्रसाद ओक आणि बालकलाकार सुमेध वाणी यांच्या अभिनयाची पण जोड आहे. दहिहंडीच्या उत्सवाचे विविध पैलू मांडणारा ‘कान्हा’ हा सिनेमा येत्या 26 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने वैभव आणि गश्मीर अभिनेत्री गौरी आणि सिनेमाच्या निर्मात्यांसोबत divyamarathi.com च्या ऑफिसमध्ये आले होते. यावेळी वैभवने अनेक खास गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, 'कान्हा'विषयी काय सांगतोय वैभव...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...