आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

V\'day Spl : कुणी 55, कुणी 37 तर कुणी 25 वर्षांपासून निभावत आहेत साथ, भेटा मराठी कपल्सना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं... हे अगदी बरोबर आहे. सामान्य माणुस असो, किंवा सेलिब्रिटी प्रेम हे सर्वांसाठी सारखंच असतं. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. म्हणूनच आपला आयुष्यभराचा सोबती कधी कुठल्या वळणावर आपल्याला भेटेल याचा काही नेम नसतो. माणुस श्रीमंत असो वा गरीब प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. आज आहे प्रेमाचा दिवस. अर्थातच व्हॅलेंटाइन डे. आजच्या दिवशी प्रियकर-प्रेयसी आपल्या प्रेमाची कबुली देतात. एकमेकांसोबत जगण्याच्या आणाभाका खातात आणि याच दिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या सेलिब्रिटींचं कसं बहरलं प्रेम हे सांगणार आहोत.
 
मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर रोमान्स करणारे सेलिब्रिटी खासगी आयुष्यातसुद्धा प्रेमात पडले आहेत. सचिन पिळगांवकर, अतुल परचुरे, केदार शिंदे, सचित पाटील यांसह काही सेलिब्रिटींनी लव्ह मॅरेज केले आहे. तर विजय पाटकर, पंकज विष्णूसह अनेक सेलिब्रिटींनी अरेंज मॅरेज केले. आपल्या अभिनयाने एक काळ गाजवाणारे ज्येष्ठ अभिनिते रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाला 55 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांत या दोघांमधील प्रेम अधिकच खुलत चाललंय.
 
चला तर मग मराठी इंडस्ट्रीतील तुमच्या आवडत्या कलाकाराला त्याचा आयुष्यभराचा साथीदार कसा गवसला आणि त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला किती वर्षे झाली आहेत, हे जाणून घेऊयात...
 
बातम्या आणखी आहेत...