आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येऊ द्या\'च्या मंचावर सेलिब्रिटी करणार प्रेमाच्या दिवसाचं खास Celebration

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या च्या या आठवड्यात सोमवारी ध्यानीमनी चित्रपटाची टीम प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली होती. या सिनेमातील प्रमुख कलाकार महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे, लेखक प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत मेधा मांजरेकर यांचीही विशेष उपस्थिती होती. आज (14 फेब्रुवारी) म्हणजेच मंगळवारी व्हॅलेंटाईन्स स्पेशल एपिसोड काही खास जोड्यांसोबत रंगणार आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिजीत खांडकेकर आणि संकर्षण क-हाडे हे सेलिब्रिटी त्यांच्या Better Half सोबत या प्रेमाच्या दिवसाचं खास सेलिब्रेशन चला हवा याऊ द्याच्या मंचावर करणार आहेत. शोची सुरुवातच अभिजीत खांडकेकर आणि त्याची बेटर हाफ सुखदा यांच्या रोमँटिक डान्सने होणारेय. तर चिन्मयचा भन्नाट उखाणासुद्धा प्रेक्षकांना पोटधरुन हसवणार आहे. चिन्मय आणि त्याची पत्नी गिरीजा यांच्या गाण्याची ट्रीटसुद्धा या भागात प्रेक्षकांना मिळणारेय. त्यामुळे सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या या Special moments साठी मंगळवारचा एपिसोड मुळीच मिस करायला नको.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सोमवार आणि मंगळवारच्या भागाची ही खास क्षणचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...