आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Never Seen Before: दिलीप साहेब, अशोक सराफ, महेश कोठारेंसोबत लक्ष्या, बघा 27 दुर्मिळ फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छायाचित्रे हा आठवणींचा खजिना असतो. एखादी व्यक्ती हयात नसताना ती व्यक्ती छायाचित्रांच्या माध्यमातून कायम आपल्याला भेटत असते. अशाच एका व्यक्तीच्या अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आम्ही बोलतोय ते सर्वांच्या लाडक्या लक्ष्या अर्थातच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी.
लक्ष्मीकांत यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आज ते आपल्यात नाहीत. मात्र कलाकृतींच्या माध्यमातून ते कायम आपल्याला भेटत असतात. आता तर त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेसुद्धा त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्यास सज्ज झाला आहे. 'सध्या ती काय करतेय' या आगामी मराठी सिनेमात अभिनय बेर्डे एका महत्त्वाच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणारेय. त्यामुळे साहजिकच अभिनयच्या रुपात लक्ष्मीकांतला भेटण्याची संधी आता लक्ष्मीकांत बेर्डेंच्या चाहत्यांना भेटणार, असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेंची अतिशय दुर्मिळ छायाचित्रे दाखवत आहोत. अगदी झपाटेलला या सिनेमाच्या शूटिंगपासून ते दिलीप साहेब, अशोक सराफ, निळू फुले, अक्षय कुमार, अनिल कपूर, सचिन पिळगांवकर यांच्यासोबतच्या छायाचित्रांचा समावेश यामध्ये आहे.
चला तर मग बघा, लक्ष्मीकांतची यापूर्वी क्वचितच कधी तुम्ही पाहिले असतील असे 27 Rare Photographas...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...