आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veteran Actor Sachin Khedekar Talks About Films And His Life

\'अमिताभमुळे अतिशय टेन्शनमध्ये आलो होतो मी\', जाणून घ्या असं का म्हणाले सचिन खेडेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूरः टीव्ही आणि सिनेअभिनेते सचिन खेडेकर यांनी अलीकडेच रायपूरला भेट दिली होती. येथे आयोजित इंटरनॅशनल पिल्म फेस्टिव्हलमध्ये ते सहभागी झाले होते. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी आपल्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. म्हणाले, अमिताभ बच्चनमुळे दीर्घकाळ होतो टेंशनमध्ये...
काय होते कारण...
- सचिन यांनी सांगितले, की मराठीतील 'कौन बनेगा करोडपती'चे दोन सीझन मी होस्ट केले होते.
- शोची ऑफर आल्यानंतर मी क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार दिला होता.
- ते सांगतात, की अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' हा शो यशोशिखरावर नेला होता.
- जेव्हा मी हा शो करायला लागलो, तेव्हा माझी तुलना लोक अमिताभ यांच्यासोबत करु लागले.
- माझ्या शोचा दर्जा अमिताभ यांच्या शोसारखा राखणे, हे माझ्यासाठी एक मोठा आव्हान होते. त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये राहायचो.
- अमिताभ यांचे शूटिंग लाइव्ह किंवा त्यांना टीव्हीवर बघताना मी अधिकच नर्व्हस व्हायचो, असे सचिन सांगतात.
- ते म्हणाले, मी बिग बींचे होस्टिंग टेक्निक्स फॉलो केले आणि दोन सीझन यशस्वीरित्या हाताळले.
पुढे वाचा, मी जिवंत आहे, हे महिनाभर सांगत राहिलो... (सोबतच पाहा, रायपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असतानाची सचिन खेडेकर यांची छायाचित्रे)