आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'फास्टर फेणे\'च्या अॅक्ट्रेसचा लग्नाचा VIDEO पाहिलात का तुम्ही!! 29 फेब्रुवारीचा साधला होता मुहूर्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या 'फास्टर फेणे' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातून अमेय वाघ आणि पर्ण पेठे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमेय आणि पर्ण हे दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चेहरे आहेत. विशेष म्हणजे खासगी आयुष्यात अमेय आणि पर्ण हे दोघांचे खूप चांगले मित्रसुद्धा आहेत. पर्णच्या लग्नात अमेय आवर्जुन हजर होता. 

पडद्यावरचे 'रमा-माधव' ख-या आयुष्यात आहेत श्री आणि सौ... 
पर्णने मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. याच चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आलोक राजवाडे हा पर्णचा ख-या आयुष्यातला जोडीदार आहे. गेल्यावर्षी 29 फेब्रुवारीचा मुहूर्त साधत पर्ण आणि आलोक एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार झाले. विशेष म्हणजे लग्नाच्या दीड वर्षांनी या दोघांच्या लग्नसोहळ्याचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे. 15 मिनिटांच्या या व्हिडिओत पर्ण-आलोकचा संपूर्ण विवाहसोहळा बघायला मिळतोय. 
 
पर्ण-आलोकचे कोर्ट मॅरेज... 
पर्ण- आलोकच्या लग्नाची खास गोष्ट म्हणजे दोघांनी लग्नाच्या विधी न करता‘कोर्ट मॅरेज’ला प्राधान्य दिले. पुण्यातील एका मंगल कार्यालयात दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केले. लग्नाच्या दिवशी पर्ण लाल रंगाची साडी आणि त्यावर सोन्याचे दागिने अशा पारंपरिक लूकमध्ये दिसली, तर आलोक सदरा लेंगा आणि त्यावर नेहरू जॅकेट अशा साध्याच लूकमध्ये दिसला.
 
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती... 
रंगभूमीवर एकत्र काम करता-करता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला सुयश टिळक, जितेंद्र जोशी, निपूण धर्माधिकारी, अमेय वाघ, गायिका सावनी रविंद्र यांनीउपस्थिती लावली होती. पर्ण आणि आलोक आपल्या मित्रांसोबत भरपूर धमाल करताना दिसले. शिवाय व्हिडिओत पर्ण-आलोकच्या अनेक मित्रांनी पर्ण-आलोकच्या प्रेमाबद्दल आपले विचार मांडत काही आठवणींना उजाळा दिला. 

जितेंद्र जोशीने दिल्या होत्या या क्यूट कपलला खास शुभेच्छा... 
अभिनेता जितेंद्र जोशीने पर्ण-आलोकच्या लग्नाचा एक फोटो शेअर करुन लिहिले होते, ''सहा वर्षांपूर्वी जे भाकित केलं ते काल प्रत्यक्षात आलं. आलोक आणि पर्ण विवाहबद्ध झाले. अत्यंत प्रेमळ अशी ही दोन मुलं ज्यांच्या सहवासात खूप आश्वस्त आणि सुखरूप वाटतं. यांना मोठं होताना पाहणं हा सुन्दर अनुभव आहे. एकमेकांवर आणि इतरांवरही खूप खूप प्रेम करण्याची कुवत असणाऱ्या या लेकरांना आनंद लाभो हीच निसर्गाकडे प्रार्थना!!''
 
पाहुयात, नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला पर्ण आणि आलोकच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ आणि सोबतच त्यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...